Viral Video: 'हात लावायचा नाय, चावलंच तुला! थेट अधिकाऱ्यालाच धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video News

Viral Video: 'हात लावायचा नाय, चावलंच तुला! थेट अधिकाऱ्यालाच धमकी

Viral Video News: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो व्हिडिओ आहे खलिफाबाग चौकातील. त्यामध्ये त्या युवतीनं महिला पोलिसांनी धमकी दिली आहे. त्यामुळे मात्र ती चर्चेत आली आहे. अनेकांनी त्या व्हायरल व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करुन युवतीच्या आक्रमकपणावर जोरदार टीका केली आहे.

त्याचं झालं असं की, खलिफाबाग चौकापासून स्टेशनपर्यतच्या रस्त्यात असणाऱ्या दुकानदारांनी अतिक्रमण केले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. नुसता आरोपच नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पालिका प्रशासनानं सांगितले. यासगळ्यात त्या मुलीनं महिला पोलिसाला दिलेली धमकी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिनं काही केल्या आपण दुकान हटवून देणार नाही. असे सांगितले आहे.

हे माझ्या वडीलांचे दुकान आहे. आणि मी ते काही झाले तरी सोडणार नाही. असे ती युवती सांगत होती. मात्र अधिकाऱ्यांनी ते दुकान पाडून टाकले. त्यानंतर त्या युवतीनं अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तिनं त्या अधिकाऱ्यांकडे आय डी कार्डची मागणी केली. त्यानंतर ते निघुन गेले. युवतीचे म्हणणे होते की, त्यांनी विनाकारण त्रास दिला.

हेही वाचा: Viral: 'कुणी तरी येणार येणार गं!' पोलीस ठाण्यातच 'डोहाळे जेवण'

साधारण तासभर चाललेल्या त्या वादात, युवतीनं त्या अधिकाऱ्यांना धमकीच दिली. मला सोडा नाहीतर मी चावेल...दिवाळीच्या निमित्तानं अतिक्रमण हटविण्याचे कामकाज सुरु आहे. अशावेळी अनेक दुकानदारांना त्याचा फटका बसला आहे. अशावेळी त्या युवतीच्या वडीलांचे दुकान पाडण्यात आले. मात्र ज्या प्रशासनाकडून ते पाडण्यात आले त्यांच्याविषयी युवतीनं नाराजी व्यक्त केली. वाद घालत तिनं खबरदार, मला हात लावू नका नाहीतर मी तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. असे म्हटले आहे.

हेही वाचा: Viral Video : नाशिकमधल्या मुक-बधीर जोडप्याने जिंकली नेटकऱ्यांची मनं