Viral Video | शाळकरी मुलीच्या गाण्यावर IAS फिदा; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

सरकारी शाळेत असलेल्या एका मुलीने आपल्या सुरेल आवाजात सलमान खानचं लोकप्रिय गाणं गायलं.

Viral Video: शाळकरी मुलीच्या गाण्यावर IAS फिदा; पाहा व्हिडिओ

तुम्हाला आठवत असेलच छत्तीसगडमधील (Chhattisgarh) एका मुलाने त्याच्या शाळेत 'बचपन का प्यार' हे गाणं गायल्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर (Social Media) सहदेव दिरदो नावाचा एक मुलगा आता स्टार झाला आहे. बॉलिवूड गायक बादशाहनेही त्याच्यासोबत एक व्हिडिओ शूट केला. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तो मुलगा नक्की आठवेल. सरकारी शाळेत असलेल्या एका मुलीने आपल्या सुरेल आवाजात सलमान खानचं लोकप्रिय गाणं गायलं.

हेही वाचा: Viral Video : मुलीसोबत आईचाही झाला असता अपघात! पण...

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) एक 8 वर्षांची मुलगी तिच्या गायलेल्या गाण्यामुळे व्हायरल (Viral Video) झाली आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ एक लाख ३७ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि आठ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावेळी पोलिस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,"किती गोड आवाज आहे."

हेही वाचा: Viral Video : कुत्र्याने पहिल्यांदाच स्वतःला पाहिले आरशात अन्...

या व्हिडिओमध्ये, मुरी मुरामी (Muri Murami) नावाची एक लहान मुलगी सलमान खान आणि राणी मुखर्जी यांचे लोकप्रिय गाणे 'कहीं प्यार ना हो जाए' गाताना दिसत आहे. अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी हे गाणं गायलं आहे. मुरी दंतेवाडा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकते. व्हिडिओमध्ये तिने शाळेचा गणवेश घातलेला दिसतोय आणि मधुर आवाजात गाताना ती गोंडस दिसतेय. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला.एका युझरने लिहिले, "ती लहान मुलगी किती सुंदर गायली आहे." आणखी एका ट्विटर युझरने सांगितले की, एक दिवस ती मोठी स्टार होईल आणि ती पुढची लता मंगेशकर असेल.