काश्मिरात वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; दोडा जिल्ह्यात संचारबंदी लागू

हा कथित व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला आणि कायदा हातात घेणाऱ्याला आम्ही सोडणार नाही.
Night Curfew
Night Curfewsakal

जम्मू : वादग्रस्त पोस्टमुळे जम्मू काश्मिरातील दोडी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोडा जिल्ह्यात संचारबंदी लागू करून भादेरवाह पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Curfew In Jammu Kashmir )

जम्मूच्या बडेरवाह येथील मशिदीतून चिथावणीच्या घोषणा देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. "हा कथित व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला आणि कायदा हातात घेणाऱ्याला आम्ही सोडणार नाही." असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Night Curfew
मुंबई : मान्सूनपूर्व पावसानेच लोकलचा खोळंबा

सध्या देशभरात मशिदीवरील भोंगे आणि शिवलिंग शोधण्यावरून तणाव निर्माण होत आहे. त्यातच मशिदीतील वादग्रस्त आणि चिथावणी देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी जम्मू काश्मिरमधील दोडा जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com