आली लहर, केला कहर! कचोरी खायची म्हणून मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO VIRAL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video loco pilot stopped train to eat kachori

आली लहर, केला कहर! कचोरी खायची म्हणून मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO VIRAL

नवी दिल्ली : प्रवास करताना तुम्हाला अचानक कुठलातरी पदार्थ खायची इच्छा झाली तर तुम्ही काय कराल? खासगी वाहनाने प्रवास करत असेल तर आपण रस्त्यात गाडी थांबवून तो पदार्थ खाण्याचा आस्वाद घेऊ शकतो. पण, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असाल तर ते कुठेही थांबवता येणार नाही. पण, एका लोको पायलटनं आपली कचोरीची भूक मिटविण्यासाठी चक्क रेल्वे मध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला. (Viral Video Loco Pilot Stopped Train Eat Kachori)

हेही वाचा: Kacha Badamच्या भुवनचं नवं गाणं व्हायरल| Viral Video

रेल्वे मध्येच थांबली अन्...

रेल्वे थांबवण्याची ही घटना कुठे विदेशात नाहीतर आपल्याच देशातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात घडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रेल्वे येत असताना एक माणूस रेल्वे रुळाच्या मधोमध वाट पाहताना दिसतोय. त्याच्या हातात एक पार्सल असू रेल्वे आल्यानंतर लोको पायलटजवळ ते पार्सल देतोय. काही वेळासाठी रेल्वेचा वेग मंदावतो आणि पार्सल घेऊन रेल्वे हळूहळू घटनास्थळावरून निघून जाते, असं या व्हिडिओमध्ये दिसतेय. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटिझन्सकडून त्यावर बरीच टीका करण्यात आली आहे. काहींनी चालकाचे समर्थन केले तर काहींनी ही घटना किती बेकायदेशीर आहे, असं म्हटलंय.

रेल्वेनं घेतली गंभीर दखल -

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर पश्चिम रेल्वेने घटनेची गंभीर दखल घेतली. त्यानंतर लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट, दोन गेटमन आणि स्टेशन मास्तरसह पाच जणांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली असून लोको पायलटला कचोरी खाण्याची इच्छा झाली म्हणून त्यानं पार्सल मागवल्याचं, उत्तर-पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशी किरण यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितले.

Web Title: Viral Video Loco Pilot Stopped Train To Eat Kachori Suspend Five Employee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :railwayvideo viral
go to top