Viral Video | लग्नात नववधू 'Out Of Control' अन् मग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

काही व्हिडिओ तर खूप मजेशीर असतात, जे सोशल मीडिया यूजर्सना पाहायला खूप आवडतं.

Viral Video : लग्नात नववधू 'Out Of Control' अन् मग...

सोशल मीडियावर (Social Media) लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. यातील काही व्हिडिओ तर खूप मजेशीर असतात, जे सोशल मीडिया यूजर्सना पाहायला खूप आवडतं. तर काही धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळतात. लग्नसमारंभात अनेक वेळा काही गोष्टी घडतात, ज्या वधू-वरांसाठी अविस्मरणीय क्षणासारख्या असतात. सोशलमीडियावर वधू-वराशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.

हेही वाचा: Viral Video : आईचे शब्द ऐकताच, दोन महिन्यांच्या बाळाची तत्पर प्रतिक्रिया...

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो लग्नातील विधीचा आहे. या व्हिडीओमध्ये नववधू काही काम करताना दिसत आहे, जे पाहून नवरदेवही अचंबित होतो. त्याचवेळी शेजारी उभे असलेले नातेवाईकही नववधूकडे एकटक पाहू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात पाहिला जात आहे आणि शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूच्या या वागणुकीवर नवरदेवाची रिअॅक्शन दिसून येतीय.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वधू-वर फेरे घेत आहेत. यावेळी नववधूला भरपूर झोप येतीय. व्हिडिओमध्ये तुम्ही वधूला जांभई देताना पाहू शकता. असे दिसते आहे की नववधू बऱ्यापैकी थकलेली दिसत आहे. यानंतर वधूला फेरे दरम्यानच जांभई येत असलेल व्हिडिओमध्ये दिसत आहे. नववधूला जांभई देताना पाहून नवरदेव आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहतो.

हेही वाचा: Viral Video : माजंरीला पाहण्यासाठी दोन पायांवर उभा राहिला कुत्रा

हा व्हायरल व्हिडिओ पिंकविलाने (pinkvilla) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "अशा नववधूला टॅग करा जिच्यासाठी तिची झोप तिच्या लग्नापेक्षा जास्त महत्त्वाची आहे."व्हायरल व्हिडिओ पाहून लोक मजेशीर कमेंट करत आहेत. झोप हीसुद्धा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे काही मुली कमेंट्समध्ये सांगत आहेत. एकवेळचे जेवण मिळाले नाही तरी चालेल पण झोप पाहिजेच, असे काही जण म्हणत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 65 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.