विराट कोहली-अनुष्काच्या विवाहाचा मुहूर्त ठरला

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

विराट श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत खेळणार नाही. त्याने बीसीसीआयकडे खासगी कामांसाठी रजा मागितली होती; मात्र, ही रजा लग्नासाठी घेतल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. विराट आणि अनुष्काच्या प्रेमसंबंधांविषयी चार वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे प्रेमसंबंध जगजाहीर आहेत. पुढील आठवड्यात ते लग्नबेडीत अडकणार असल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघे 9 किंवा 10 डिसेंबरला इटलीमध्ये लग्न करणार आहेत. यासाठी विराट गुरुवारी (ता. 7) इटलीला जाणार आहे. अनुष्का लग्नामध्ये "सब्यसाची'ने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार आहे. विराट आणि अनुष्का यांच्या मित्रमंडळींच्या राहण्याची सोय इटलीतील एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला मुंबईत स्वागत समारंभ होणार असल्याचेही समजते; मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

विराट श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत खेळणार नाही. त्याने बीसीसीआयकडे खासगी कामांसाठी रजा मागितली होती; मात्र, ही रजा लग्नासाठी घेतल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. विराट आणि अनुष्काच्या प्रेमसंबंधांविषयी चार वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

Web Title: Virat Kohli and Anushka Sharma are getting married next week