विराट कोहली, साक्षी मलिकला पद्मश्री

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

नवी दिल्ली - प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा आज (बुधवार) सरकारकडून करण्यात आली असून, क्रिकेटपटू विराट कोहली, ऑलिंपिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्यासह अन्य काही जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी आज पद्मश्री पुरस्कार विजोत्यांची घोषणा करण्यात आली. तर, पद्मविभूषण आणि पद्मभूषण या पुरस्कार विजेत्यांची नावे आज सायंकाळी जाहीर होणार आहेत. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. 

पद्मश्री विजेते - 

 • विराट कोहली (क्रिकेटपटू)
 • साक्षी मलिक (कुस्तीपटू)
 • दीपा मलिक (पॅरालिंपिकपटू)
 • दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)
 • भावना सोमय्या (पत्रकार)
 • श्रीजेश (हॉकीपटू)
 • विकास गौडा (थाळीफेकपटू)
 • सी नायर (नर्तक)
 • अनुराधा पौडवाल (गायिका)
 • कैलाश खेर (गायक)
 • संजीव कपूर (शेफ)
 • नरेंद्र कोहली (लेखक)
 • कंबल सिब्बल (माजी परराष्ट्र सचिव)
 • काशिनाथ पंडीत (लेखक)
Web Title: Virat kohli, Deepa Karmakar, Sakshi Malik given padamshri award