'मी नाही, माझ्या बॅटने दोनवेळा त्रिशतके केली!'

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

गुरमेहर कौर हिने, मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. 'अभाविप'ला मी घाबरत नाही. मी एकटी नाही तर देशातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे. माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे युद्धाने मारले.

नवी दिल्ली - माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे, युद्धाने मारले, अशा मजकुराचा फलक घेऊन सोशल मिडीयावर छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या गुरमेहर कौरला वीरेंद्र सेहवागने आपल्या शैलीत उत्तर देत दोन त्रिशतके मी नाही, तर माझ्या बॅटने केली असे म्हटले आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या रामजास महाविद्यालयात बुधवारी (ता. 22) अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या "ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन'च्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कारगिलमधील हुतात्मा कॅप्टन मनदीप सिंह यांची मुलगी गुरमेहर कौर हिने सोशल मीडियावर "अभाविपला मी घाबरत नाही' असा प्रचार सुरू केला. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. 'जेएनयू'मधील विद्यार्थी उमर खालिद आणि शेहला मसूद यांना चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यावरून तणाव निर्माण झाला होता. 

गुरमेहर कौर हिने, मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. 'अभाविप'ला मी घाबरत नाही. मी एकटी नाही तर देशातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे. माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे युद्धाने मारले,'' अशा मजकुराचा फलक हातात धरलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले. या पोस्टवरून देशभर वातावरण पेटले असून, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. सेहवागनेही बॅट मे है दम असे ट्विट करत हातात फलक घेऊन फोटो पोस्ट केला आहे.

Web Title: virendra sehwag tweets on kargil martyrs daughter