'व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे'

kanak sarkar
kanak sarkar

कोलकताः कुमारी वधू का नाही? व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे असतात, असा वादग्रस्त मजकूर जाधवपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट केला होता. या पोस्टवर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवल्यानंतर ती काढून टाकण्यात आली.

जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकारने फेसबुकवर अनेक वादग्रस्त वक्तव्य लिहिली आहेत. कनक सरकारने लिहीले आहे की, 'कुमारी वधू का नाही? तुम्हाला कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेलं असेल तर चालेल का? मुलं मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा माहिती नसतो. मुलगी जन्माला आल्यापासून तोपर्यंत सील्ड असते, जोपर्यंत ते उघडलं जात नाही. कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मूल्यं तसेच लैंगिक स्वच्छतेसोबत अनेक गोष्टी आहेत. अनेक मुलांसाठी कुमारी वधू एखाद्या परीप्रमाणे असते.'

प्रतिष्ठित विद्यापीठाच्या प्राध्यापकांने अशा प्रकारची टिपन्नी फेसबुकवर केल्यामुले प्रच्ंड गदारोळ सुरू झाला. अखेर नेटिझन्सपुढे कनक सरकारला झुकावे लागले व पोस्ट काढून टाकावी लागली. शिवाय, आपण काहीच चुकीचे बोललो नाही. 'राज्यघटनेने मला माझे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. आपण नेहमी महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत असून, हे माधे वैयक्तिक मत होते. मी कोणत्याही व्यक्तीविरोधात तसेच कोणत्याही पुराव्याशिवाय काही म्हटलेले नाही. मी समाजाच्या चांगल्यासाठीच लिखाण करत आहे. माझ्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर होत आहेत, कृपया लोकांची दिशाभूल केली जाऊ नये. आपले विचार व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी महिलांसाठी आणि त्यांची बाजू मांडणाऱ्या अनेक पोस्ट केल्या आहेत. माझ्या टाइमलाइनवर जाऊन तुम्ही त्या पाहू शकता,' असेही कनक सरकारने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com