वारसा स्थळांचा आभासी प्रवास; रेल्वे मंत्रालयाची योजना

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध वारसा स्थळांचा प्रवाशांना आभासी प्रवास घडवून आणण्याची रेल्वेने योजना आखली असून, त्यानुसार प्रवासादरम्यान किंवा शाळेतील वर्गात बसल्या ठिकाणी स्थळदर्शन घडवून आणण्यात येणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगलचे तंत्रज्ञान मदत करणार असून, थ्रीडी चष्म्याची आवश्‍यकता लागणार आहे. 

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध वारसा स्थळांचा प्रवाशांना आभासी प्रवास घडवून आणण्याची रेल्वेने योजना आखली असून, त्यानुसार प्रवासादरम्यान किंवा शाळेतील वर्गात बसल्या ठिकाणी स्थळदर्शन घडवून आणण्यात येणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगलचे तंत्रज्ञान मदत करणार असून, थ्रीडी चष्म्याची आवश्‍यकता लागणार आहे. 

राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय पाहण्यासाठी किंवा निसर्गसुंदर काल्का-सिमला रेल्वे मार्ग पाहण्यासाठी दिल्ली किंवा सिमल्याला जाण्याची गरज भासणार नाही. कारण रेल्वे खात्याच्या मदतीने आभासी तंत्राच्या साह्याने वारसा आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानके, रेल्वे पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे रेल्वेत प्रवास करणारे प्रवासी किंवा दुर्गम भागातील विद्यार्थी वर्गात बसून आकर्षित करणाऱ्या ठिकाणांना आभासी पद्धतीने पाहू शकणार आहेत. यासाठी रेल्वेने गुगल कंपनीशी करार आहे. यानुसार प्रमुख स्थळ थ्रीडी स्वरूपात पाहणे शक्‍य होणार आहे. आभासी प्रवासासाठी प्रवाशांना विशेष चष्मा दिला जाणार आहे. या चष्म्यामुळे प्रवासी संबंधित ठिकाणी न जाता तेथे गेल्याचा आनंद घेता येणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात ही विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित राहणार आहे.

यासंदर्भात रेल्वेचे कार्यकारी संचालक सुब्रत नाथ (वारसा विभाग) म्हणाले, की रेल्वे मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांना चष्मे पुरवण्यात येणार आहेत. हे चष्मे प्रवाशांना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. यासाठी किमान दोनशे रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. याचा वापर करण्यासाठी नागरिकांना गुगलचे विशेष एक्‍सिपिडीशन ऍप डाउनलोड करावा लागणार आहे किंवा त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन त्याचा प्रयोग करावा लागणार आहे. रेल्वे विभागाच्या पुढाकारामुळे मुलांना आभासी वास्तव आणि विकसित वास्तव, याची माहिती घेऊ शकतील. यानिमित्ताने भिंती नसलेल्या वर्गाची निर्मिती होईल, अशी अपेक्षा रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.

पहिल्या टप्प्यात काल्का-सिमला रेल्वे आणि सीएसएमटी मुंबईची आभासी रचना तयार केली जाणार आहे. दोन्ही स्थळे युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेली आहेत. 

Web Title: Virtual Travel of Warsaw Venues Ministry of Railway Scheme