esakal | भारतात अडकलेल्या अफगाण नागरिकांच्या व्हिसाची मुदत वाढणार; पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Afgan People

भारतात अडकलेल्या अफगाण नागरिकांच्या व्हिसाची मुदत वाढणार; पण...

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : विविध कारणांसाठी भारतात आलेल्या अफगाण नागरिकांची व्हिसाची मुदत वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र नव्या नियमावलींतर्गत व्हिसाची मुदत वाढवण्यात येईल, असंही सरकारनं जाहीर केलं आहे.

अफगाणिस्तानात सध्या गोंधळाची स्थिती आहे, त्यामुळेही तिथले काही नागरीक निर्वासित म्हणून भारतात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर यापूर्वीपासून शिक्षण, नोकरी-धंदा आणि पर्यटन व्हिसावर काही नागरीक भारतात आलेले आहेत. परंतू सध्या अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडल्यानं ते पुन्हा मायदेशी परतण्याच्या स्थितीत नसल्यानं अशा नागरिकांच्या व्हिसाची मुदत नव्या नियमावलींतर्गत वाढवण्यात येणार आहे, असंही केंद्र सकारनं स्पष्ट केलं आहे.

व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी लागणार नाही शुल्क

दरम्यान, कोविडच्या आपत्कालिन स्थितीमुळं भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळं, अशा परदेशी नागरिकांना आता आपला व्हिसा वाढवून मिळण्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही. पण त्यांना भारताबाहेर जायचं असेल त्यांना e-FRRO portal वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी व्हिसाच्या मुदतीनंतर राहिल्याबद्दल कुठलाही दंड भरावा लागणार नाही.

तसेच ज्या परदेशी नागरिकांना ३० सप्टेंबरनंतरच्या वाढीव कालावधीसाठी व्हिसाची मुदत वाढवून घ्यायची असेल त्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. हा अर्ज करताना त्यांना निश्चित करण्यात आलेली फी देखील भरावी लागेल. त्यानंतर योग्य खातरजमा करुन या अर्जाला FRRO कडून मंजुरी देण्यात येईल, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

loading image
go to top