आईने बकऱ्या पाळून चालवलं घर, शिक्षकानं भरली फी! IAS विशालची संघर्षमय कहाणी जाणून घ्या

अत्यंत गरीब कुटुंबातील विशालने यूपीएससीमध्ये 484वा रँक मिळवून यश संपादन केले आहे.
IAS Vishal, UPSC Success Story
IAS Vishal, UPSC Success StorySakal

UPSC Success Story: जिद्द आणि चिकाटी असली, तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असूद्या, यश मिळवता येते. मुझफ्फरपूरच्या विशालने ही म्हण खरी करून दाखवली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील विशालने यूपीएससीमध्ये ४८४ वा रँक मिळवून यश संपादन केले आहे. आपल्या यशाचे श्रेय तो कुटुंबासह शिक्षिका गौरी शंकर प्रसाद यांना देतो.

विशालने सांगितले की, त्याच्या शिक्षिका गौरी शंकर यांनी त्याला कठीण परिस्थितीत मदत केली आणि यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहित केले. विशाल म्हणाला, "शिक्षिका गौरी शंकर यांनी माझ्या अभ्यासाची फी भरली. माझ्या शिक्षणादरम्यान, पैशांअभावी मला जगण्यात अडचणी येत होत्या, तेव्हा त्यांनी मला त्यांच्या घरात ठेवले. मी कामाला लागलो तेव्हा त्यांनीच मला नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्यास सांगितले. त्या काळातही त्यांनी मला आर्थिक मदत केली. (Vishal from Muzaffarpur has become an IAS by getting 484th rank in UPSC.)

IAS Vishal, UPSC Success Story
UPSC मध्ये उपराजधानीतील तिघांची बाजी

खरं तर, मुझफ्फरपूरच्या मीनापूर ब्लॉकमधील मकसूदपूर गावात राहणाऱ्या विशालच्या वडिलांचा 2008 साली मृत्यू झाला होता. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपल्यानंतर विशालची आई रिना देवी यांनी मोठ्या कष्टाने शेळ्या-म्हशींचे पालनपोषण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. पण त्यांचे वडील या जगात नाहीत, याची जाणीव त्यांनी विशालला कधीच होऊ दिली नाही.

विशालचे वडील कै.बिकाऊ प्रसाद नेहमी म्हणायचे की, माझा विशाल एक दिवस शिकून मोठा माणूस होईल. विशालने आज ही गोष्ट खरी करून दाखवली. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

IAS Vishal, UPSC Success Story
स्त्री कुणापेक्षाही कमी नाही, UPSC च्या निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

विशाल 2011 मध्ये मॅट्रिकमध्ये टॉपर होता. त्यानंतर 2013 मध्ये त्याने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. 2017 मध्ये तो उत्तीर्ण झाले. त्यानंतर एक वर्ष रिलायन्समध्ये नोकरी केली. नोकरीदरम्यानच शिक्षिका गौरी शंकर यांनी त्यांना नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्यास सांगितले. नोकरी सोडल्यानंतर गौरी शंकर यांनी विशालला आर्थिक मदतही केली. आज विशालने जिद्द आणि मेहनतीने आपले लक्ष्य गाठले आहे. विशालच्या या यशाबद्दल लोक त्याचे आणि कुटुंबीयांचे अभिनंदन करत आहेत.

विशालच्या शिक्षिका गौरी शंकर यांनी सांगितले की, विशाल हा पहिल्यापासून अभ्यासात खूप हुशार होता. पण 2008 मध्ये जेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तोच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हापासून विशालने अधिक मेहनत करण्यास सुरुवात केली आणि त्याचे फळ म्हणजे आज त्याने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com