
नवी दिल्ली : ‘मतदार ओळखपत्रासाठीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देशातील मतदारांना मतदार ओळखपत्र १५ दिवसांत देण्यात येईल,’ असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यापूर्वी मतदार फोटो ओळखपत्र मतदारांपर्यंत पोहोचण्यास साधारणपणे एक महिन्याहून अधिक वेळ लागत असे. मात्र, आता हा वेळ कमी होऊन १५ दिवसांतच मतदार ओळखपत्र मिळेल, असे आयोगातील सूत्रांनी सांगितले.