online way : घर बसल्या मतदार यादीत असे शोधा नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voter id 1.jpg

Voter list : घर बसल्या मतदार यादीत असे शोधा नाव

सद्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Election) होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर यांचा समावेश आहे. आजच निवडणुकीच्या तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. १८ वर्षांवरील व्यक्ती मतदान करू शकतो. अशा स्थितीत तुमचे नाव मतदार यादीत (Voter ID Search) आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. निवडणूक (Election) आयोगाने हे तपासण्याची पद्धत अगदी सोपी केली आहे. तुम्ही घरबसल्या यादीत तुमचे नाव तपासू शकता.

पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक असणारे, बदली होऊन आलेले मतदार यादीत अपडेट तसेच नाव नोंदणी करीत असतात. अशा स्थितीत आपले नाव यादीत आहे की नाही, असा प्रश्न पडत असतो. पूर्वीसारखे बुथवर जाऊन नाव नोंदणी करण्याची गरज नाही. घरबसल्या मतदार यादीत नाव आहे की नाही, हे तपासता येते. चला तर जाणून घेऊया याची सोपी पद्धत...

हेही वाचा: ‘... तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा’

असे करा ऑनलाइन तपासणी

 • सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या http://electoralsearch.in/ वेबसाइटवर जा

 • वेबसाइटवर तुम्ही तुमचे नाव दोन प्रकारे शोधू शकता.

 • पहिली पद्धत सर्च बाय डिटेल्स (Search by Details) या नावाने आहे. जिथे तुम्ही तुमचे नाव, पत्ता आणि वय यासारखी माहिती टाकू शकता

 • दुसरा मार्ग म्हणजे search by EPIC number. येथे तुम्हाला ओळखपत्र क्रमांक (EPIC No.) टाकावा लागेल.

ओळखपत्र क्रमांकाशिवाय (EPIC No.) असे शोधा नाव

 • सर्वप्रथम सर्च बाय डिटेल्स (Search by Details) हा पर्याय निवडा

 • यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडा

 • आता खाली दिलेला कॅप्चा कोड टाका आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करा

 • त्यानंतर माहिती उघड होईल. यामध्ये तुमचा ओळखपत्र क्रमांकपासून मतदान केंद्रापर्यंत लिहिलेले दिसेल

 • तुम्ही खाली दिलेल्या प्रिंट मतदार माहिती (Print Voter Information) पर्यायावर क्लिक करून मतदार माहिती प्रिंट करू शकता.

हेही वाचा: ‘संघ मुख्यालय, स्मृती भवनाची रेकी करणे ही गंभीर बाब’

ओळखपत्र क्रमांद्वारे असे शोधा नाव

 • तुम्हाला तुमचा ओळखपत्र क्रमांक (EPIC No.), राज्य आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करायचा आहे आणि शोध पर्यायावर क्लिक करा

 • त्यानंतर संपूर्ण माहिती उघड होईल

 • यामध्ये तुमचा ओळखपत्र क्रमांक आणि मतदान केंद्रापर्यंत लिहिलेले दिसेल

 • हवे असल्यास तुम्ही खाली दिलेल्या प्रिंट मतदार माहिती पर्यायावर क्लिक करून मतदार माहिती प्रिंट करू शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top