‘संघ मुख्यालय, स्मृती भवनाची रेकी करणे ही गंभीर बाब’| Devendra Fadanvis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

‘संघ मुख्यालय, स्मृती भवनाची रेकी करणे ही गंभीर बाब’

नागपूर : काही महिन्‍यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या आतंकवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी नागपूर शहरात आरएसएसची (rss) रेकी (टेहळणी) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यास अधिकृत दुजोरा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) म्हणाले, संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची रेकी करणे ही गंभीर बाब आहे. याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे.

नागपूर हे दहशतवाद्यांचे रेस्ट झोन असल्याचे बोलले जाते. यापूर्वी अनेक दहशतवादी कारवायातील दहशतवादी येथे वास्तव्यास असे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, दाऊदचा हस्तक व दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अब्दुल करीम टुंडा याने नागपुरात काही दिवस घालवल्याची कबुली दिल्यानंतर दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा उघडकीस आले होते. त्याच्यासह अनेक दहशतवादी नागपुरात वास्तव्यास होते, अशी माहिती वेळोवेळी समोर आली आहे.

हेही वाचा: पत्नीने मुलीसोबत केली पतीची हत्या; लग्नावरून व्हायचे वाद

१९८५ मध्ये दंगल झाली त्यावेळी आपण नागपुरात होतो, असे टुंडाने दिल्ली पोलिसांना सांगितले होते. टुंडाने त्या काळात एक संघटना स्थापन केली होती. त्यात युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले होते. मोमीनपुरा भागात या संघटनेतील युवक पथसंचलन करीत होते. टुंडानंतर दहशतवादी यासीन भटकळ, अखिल खिलजी, अबू फैजल व अब्रार हे दहशतवादीही नागपुरात काही काळ मुक्कामास होते.

संघ मुख्यालय (rss) आणि स्मृती भवन (Smriti Bhavan) परिसराची रेकी करणे ही गंभीर बाब आहे. याला अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे. योग्य खबरदारी घेतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top