Loksabha Election : पूर्व विदर्भातील मतदारांचा कौल कुणाकडे?

नक्षलग्रस्त गडचिरोलीत जास्त तर शहरी नागपुरात कमी मतदान
loksabha election
loksabha electionEsakal

नागपूर : पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात काल पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले.मागच्या तुलनेत कमी मतदान झाल्याची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागपुरात कमी टक्केवारीची चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना केली. या पार्श्वभूमीवर कमी टक्केवारी महायुती की महाविकास आघाडीपैकी कोणाच्या पथ्थ्यावर पडणार याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.

loksabha election
Dharashiv News : शेवटच्या दिवशी ३६ उमेदवारांनी दाखल केले ५० अर्ज : आतापर्यंत ७५ जणांनी घेतले १७५ अर्ज

भंडारा-गोंदियात ‘फिफ्टी-फिफ्टी’

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये एकूण मतदान ६८.२७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ६४.७२ टक्के मतदान झाले आहे. तुलनात्मक पाहिल्यास जवळपास चार टक्क्यांची घट दिसून येते. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर तालुक्यांत विकास परिषद (चरण वाघमारे) तसेच विणकर समाजाने काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना पाठिंबा दिला. परमात्मा एक सेवक समाजात बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याबाबत असंतोष होता. त्याचा भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना फटका बसू शकतो. भंडारा क्षेत्रात भंडारा येथे भाजप व काँग्रेसला जवळपास समान मते पडली तर पवनी तालुक्यात काँग्रेसला अधिक मते मिळाल्याचा अंदाज आहे. लाखनी व साकोली येथे भाजप तर, पालांदूर, लाखांदूर, सानगडी, दिघोरी या भागात काँग्रेस पुढे दिसते आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मतदारांनी काँग्रेसला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. तिरोडा क्षेत्रात भाजपला आघाडीचा अंदाज आह. गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असला तरी फोडाफोडीचे राजकारण मतदार व पक्षातील पदाधिकारी यांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान केले नाही, असे बोलले जाते.

loksabha election
Nashik News : स्मशानभूमीचा होतोय कायापालट! नामपूरला लोकसहभागातून शेवटचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी धडपड

वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर?

चंद्रपूर : चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ६७.५७ एवढी असून मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान तीन टक्यांनी वाढले आहे. वाढीव मतदार नेमके कुणाच्या पथ्यावर पडणार या चिंतेने उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. यावेळी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर आणि भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत आहे. ‘वंचित’चे उमेदवार राजेश बेले फारसे चर्चेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा झाली. सभेने चांगले वातावरण केले. काँग्रेसकडून मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही. २०१९ मध्ये देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी पंधरा वर्षांनंतर चंद्रपूर लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा रोवला. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. यानंतर चंद्रपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची या दिशेने भाजपने रणनीती आखणे सुरू केले. यावेळी तगडा उमेदवार देण्याचा निर्णय भाजपने घेतला. दुसरीकडे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेचे तिकीट पक्षाकडे मागितले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुलीसाठी दिल्ली दरबारी आपले वजन लावले. परंतु, शेवटी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट फायनल झाले.

loksabha election
Dharashiv News : शेवटच्या दिवशी ३६ उमेदवारांनी दाखल केले ५० अर्ज : आतापर्यंत ७५ जणांनी घेतले १७५ अर्ज

गडचिरोलीत लढत तुल्यबळ

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील मतदारांनी लोकशाहीचा कायम विरोध करत आलेल्या नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून भरघोस मतदान केले. शुक्रवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६५.१९ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी दुर्गम भागातील पथके परत आल्यावर स्पष्ट होणार आहे.

loksabha election
Dhule News : ग्रामसेवकास माहिती आयोगाचा ‘दणका’; माहिती देण्यास टाळाटाळ भोवली

या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ७१. ९२ टक्के मतदान झाले. त्यावेळी भाजपचे अशोक नेते हेच विजयी झाले होते. यंदा २०२४ च्या निवडणुकीत ६५.१९ टक्के मतदान झाले असून भाजपकडून पुन्हा अशोक नेते हेच रिंगणात आहेत. १९९६ व २००४ त्यानंतर २०१४ व २०१९ असे चारदा भाजपने हा गड जिंकल्याचा अपवाद सोडल्यास १९६७ पासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित होताच काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी विजय प्राप्त केला. मागच्या दोन निवडणुकीत कॉँग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी यांना अशोक नेते यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. यंदा काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांच्यावर डाव लावला. नेतेंच्या हॅटट्रिकसाठी भाजपसह महायुतीनेही प्रचारात जिवाचे रान केले आहे. एकूण लढत निकराची आणि तुल्यबळ असल्याचे दिसून येते. शहरी व ग्रामीण भागांत मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुरखेडा येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच तातडीने मतदान यंत्र बदलून प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

loksabha election
Dhule News : ग्रामसेवकास माहिती आयोगाचा ‘दणका’; माहिती देण्यास टाळाटाळ भोवली

नागपुरातही भाजपला धाकधूक

नागपूर : भाजपचे हेविवेट नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यावेळी विजयासाठी चांगलेच झुंजावे लागणार असल्याचे दिसून येते. एक लाखाच्या आसपास असलेले नवमतदार कोणाला कौल देतात यावरच त्यांचे मताधिक्य अवलंबून राहील.

loksabha election
Thane News: भाजपने शिवसेनेला करु दिला नाही उमेदवाराचा प्रचार; वाद चव्हाट्यावर

पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी त्यांना चांगली लढत दिली आहे. मोदींवर मतदारांचा रोष तसेच संविधानाच्या मुद्यावरून मुस्लिम व अनुसूचित जाती-जमाती शहरात एकत्रित आल्या होत्या. हे सर्व मतदार यावेळी काँग्रेसकडे वळल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांतही धाकधूक निर्माण झाली. गडकरी यांची वैयक्तिक प्रतिमा आणि त्यांनी केलेली विकासकामे हे त्यांना तारू शकतात.

loksabha election
Nashik Protest News : आकाशवाणी टॉवरच्या भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

भाजपला सर्वाधिक मते देणाऱ्या पूर्व नागपूर आणि दक्षिण-पश्चिममध्ये अनुक्रमे ५५.७६ व ५३.३ टक्के मतदान झाले आहे. इथे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. दक्षिण-पश्चिम तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. पूर्व नागपूरने गतनिवडणुकीत गडकरींना सर्वाधिक ६० हजारांचे मताधिक्य दिले होते. यावेळी मात्र अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले आहे. दुसरीकडे नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहणाऱ्या उत्तर नागपूरमध्ये दलित तसेच आणि हलबा समाजाचे प्राबल्य आहे. येथे काँग्रेसला मताधिक्याची परंपरा यावेळीसुद्धा कायम राहील असा अंदाज आहे. पश्चिम नागपूर हा कॉँग्रेसचे लोकसभा उमेदवार विकास ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. मुस्लिम आणि हलबांचा मतदासंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य नागपूरमध्ये ५४.०२ टक्के मतदान झाले आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारी फक्त एक टक्का वाढ झाली आहे.

loksabha election
Dhule News : ग्रामसेवकास माहिती आयोगाचा ‘दणका’; माहिती देण्यास टाळाटाळ भोवली

सत्ताधाऱ्यांविरुद्ध रामटेकमध्ये वातावरण

नागपूर : रामटेकमध्ये बहुजन समाज पक्षाचा हत्ती आणि काँग्रेसचे बंडखोर व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार किती मतांचे विभाजन करतात यावर येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. येथे मतांचा टक्का सरासरी दोनने वाढला आहे. असे असले तरी येथे सुनील केदार व विरुद्ध भाजप असाच सामना रंगला. रामटेकमध्ये सुरुवातीपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. भाजपने या मतदारसंघासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला.

loksabha election
Dhule News : ग्रामसेवकास माहिती आयोगाचा ‘दणका’; माहिती देण्यास टाळाटाळ भोवली

मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. मात्र त्यांना तडजोड करावी लागली. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. हे भाजप कार्यकर्ते व शिवसैनिकांनासुद्धा पटल्याचे दिसत नाही. याचा फटका महायुतीला बसला असल्याची शक्यता मतदानानंतरच्या चर्चेतून दिसून येते. दलित व हिदू दलित असा भेदही येथे निर्माण झाला होता. शिवसेनेचा हिंदू-दलित ‘पॅटर्न’ यावरून भाजपत खदखद निर्माण झाली होती. राजू पारवे यांच्यासाठी मोदी यांनी सभा घेतली. मुख्यमंत्री जवळपास दहा दिवस येथे जाऊन-येऊन होते. दुसरीकडे काँग्रेसने अतिशय गुप्तपणे प्रचार यंत्रणा राबवली. कन्हय्याकुमार यांच्या सभा घेण्यात आल्या. माजी मंत्री सुनील केदारांनी एकहाती सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवले होते. याचा चांगला लाभ काँग्रेसला झाल्याचे समजते. काँग्रेसचे किशोर गजभिये यांची बंडखोरी, त्यांना वंचितचा पाठिंबा, बसप उमेदवारांसाठी मायावती यांची सभा झाली असली तरी मतविभाजन होण्याचा धोका काँग्रेसला दिसत नाही.

भंडारा गोंदिया

२०२४ २०१९

६४.७२ टक्के ६८.२७ टक्के

चंद्रपूर

२०२४ २०१९

६७.५७ टक्के ६४.७२ टक्के

गडचिरोली-चिमूर

२०२४ २०१९

६५.१९ टक्के ७१.९२ टक्के

नागपूर

२०२४ २०१९

५४.११ टक्के ५४.९४ टक्के

रामटेक

२०२४ २०१९

६४ टक्के ६२.१२ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com