पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरण ; परशुराम वाघमारेने केली हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे गूढ उकलले असून, याप्रकरणातील सहावा आरोपी परशुराम वाघमारेने लंकेश यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. याबाबतची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी दिली.

बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे गूढ उकलले असून, याप्रकरणातील सहावा आरोपी परशुराम वाघमारेने लंकेश यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. याबाबतची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी दिली.

पत्रकार गौरी लंकेश यांची मागील वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरु होता. याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली. यातील सहावा आरोपी असलेला परशुराम वाघमारेने लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या केली. याबाबत एसआयटीच्या विशेष तपास अधिकाऱ्यांनी सांगितले, की कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी ज्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. अशाच शस्त्रांचा वापर गौरी लंकेश यांच्या हत्येसाठीही करण्यात आला होता. परशुराम वाघमारे या आरोपीने लंकेश यांची गोळी झाडून हत्या केली. मात्र, ती शस्त्रे अद्याप हस्तगत करण्यात आली नाही, याबाबतची माहिती फॉरेन्सिक अहवालातून समोर आली आहे. 

दरम्यान, या टोळीचे नेटवर्क मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात असल्याचे तपासात समोर आले. मात्र, त्यांचे नेटवर्क उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Web Title: Waghmare killed Lankesh unnamed outfit has footprints in 5 states SIT