वणी दहशतवादी नव्हे हुतात्मा- पीडीपी आमदार

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

जम्मू- हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हान वणी हा दहशतवादी नव्हे तर हुतात्मा आहे, असे वक्तव्य सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते मुश्ताक अहमद शाह यांनी केल्याने खळबळ उडाली.

शाह म्हणाले, "मी स्वतः त्रालचा रहिवासी असल्यामुळे मला माहीत आहे की, लोकांमध्ये बुऱ्हान वणी यांच्याबद्दल किती प्रेम व आदर आहे. त्यांच्या मृत्युबद्दल लोकांनी शोक व्यक्त करणे समर्थनीय आहे."

शाह हे त्रालमधील दक्षिण काश्मीर विधानसभा मतदारसंघातील ‘पीडीपी‘चे आमदार आहेत. बुऱ्हान वणी मूळचा येथील होता. 

‘वणी यांच्या महान आणि पवित्र व्यक्तिमत्वामुळे लोकांनी त्यांना प्रेम दिले,‘ असे वादग्रस्त विधान शाह यांनी केले. 

Web Title: Wani not terrorist hutatma PDP MLA

टॅग्स