Waqf Board Law: 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड' आता राष्ट्रपतींना घालणार साकडं! तातडीच्या भेटीची केली विनंती

Waqf Board Amendment Act : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. याला आता विविध राज्यांमधून विरोधही होताना दिसतो आहे.
President Draupadi Murmu
President Draupadi Murmu
Updated on

Waqf Board Amendment Act : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 'वक्फ सुधारणा विधेयक 2025' मंजूर झाल्यानंतर आता हतबल झालेल्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना साकडं घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीची भेट मागितली आहे. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी या विधेयकावर सही करु नये अशी विनंती करण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत निवेदनच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com