नगरसेवकाचे महिलेशी गैरवर्तन! विरोध करणाऱ्या महिलेच्या पतीची हत्या करून झाला फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Councillor molested the woman

नगरसेवकाचे महिलेशी गैरवर्तन! विरोध करणाऱ्या महिलेच्या पतीची हत्या करून झाला फरार

पाटणा - प्रभागातील नगरसेवकाने महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा प्रयत्न केला. याला महिलेच्या पतीने विरोध केला. यावरून आरोपी नगरसेवकाने महिलेच्या पतीवर हल्ला करत त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर आरोपी नगरसेवक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

हेही वाचा: भारताचा सर्वात मोठा पप्पू, अमित शहा; तृणमूल काँग्रेसची भाजपविरुद्ध मोहीम

घटना पाटना येथील बिहटा पोलीस स्टेशन हद्दीतील इटावा डोघरा गावातील आहे. महेश चौधरी असे मृताचे नाव आहे. हत्येची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बरुण गावात राहणाऱ्या आशा देवी यांच्याशी महेशचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता.

आशा देवी म्हणाल्या, “महेश आणि मी गुरुवारी रात्री उशिरा खोलीत झोपलो होतो. त्यानंतर नगरसेवक शंकर चौधरी यांनी बळजबरीने घरात घुसून माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावर पती महेश चौधरी यांनी विरोध केला. त्यामुळे आरोपी नगरसेवक आणि मृतक यांच्यात बाचाबाची झाली. पीडितेने सांगितले की, “शंकर चौधरीने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला." या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपी नगरसेवकाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात 11 सप्टेंबरला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

या घटनेला दुजोरा देताना बिहटा पोलिस स्टेशनचे प्रमुख रणजीत कुमार म्हणाले, “प्रभाग नगरसेवक शंकर चौधरी यांनी इटावा डोघरा गावात महेश चौधरीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: Ward Councillor Molested The Woman In Bihar And Strangulate Her Husband To Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Biharcrime