पावसाळ्यात डेंगीचा धोका असल्याने सावधानतेचा इशारा

dengue
dengue

नवी दिल्ली -  कोरोनापासून बचाव हे एकच आव्हान समोर ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाळा सुरू होत असल्याने डासांच्या चावण्यामुळे पसरणाऱ्या डेंगीच्या साथीचा हा मोसम चिंता वाढविणारा ठरू शकतो. कोरोना आणि डेंगी यांची काही लक्षणे समानच असल्याने देशातील आरोग्य यंत्रणा या दोन्ही साथींचा मुकाबला करण्यास कितपत सक्षम आहे, याबाबत तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. 

समान लक्षणे
ताप, अंगदुखी, डोकेदुखी

  डेंगीसाठी वेगवान निदान चाचणी उपलब्ध करून वेळेत निर्णय घेणे (एनएस १ ही चांगली चाचणी आपल्याकडे आहे)
    अद्याप डेंगी साथीचा काळ थोडा दूर असल्याने आत्तापासून त्यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज करणे
    लोकांनी स्वतःबरोबरच सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष द्यावे
    स्वच्छता आणि इतर बाबींमध्ये सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने
    कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंगीच्या रुग्णांसाठी रुग्णालयांत खाटा रिकाम्या राहणार का?
    फक्त गंभीर रुग्णांनाच तपासले जाणार का?
    दोन्ही आजारांवर उपचार करण्याइतपत वैद्यकीय मनुष्यबळ आहे का?
    सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्याने डेंगीचे निदान होऊन त्यावर उपचार होणार का?

रुग्णसंख्येची तुलना
भारतात सध्या कोरोनाचे ८ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण असून २२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २०१६ ते २०१९ मधील आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी १ ते २ लाख जणांना डेंगी होतो. २०१९ मध्ये १,३६,४२२ जणांना डेंगी झाला होता आणि १३२ जणांचा मृत्यू झाला होता.

चिंतेची कारणे
    सलग तीन दिवस ताप आल्यास दोन निदान चाचण्या कराव्या लागणार
    रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार
    कोरोना किंवा डेंगी झाल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याने एकामुळे दुसरा आजार होण्याची शक्यता

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


डेंगीच्या काळामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणखी बिघडू शकते. याबाबत सविस्तर अभ्यास झालेला नाही, मात्र दक्षिण अमेरिकेत अशाच परिस्थितीमुळे बिकट अवस्था झाली होती.
- ध्रुवज्योती चटोपाध्याय, विषाणू तज्ज्ञ

Edited by : Kalyan Bhalerao

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com