दलित असल्यामुळेच काँग्रेसने मला नाकारले मुख्यमंत्रीपद'

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

दलित असल्यामुळेच तब्बल तीनवेळा मुख्यमंत्रीपद नाकारले असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी केला आहे. जी परमेश्वर यांच्या आरोपामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत सापडली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने जेडी(एस)ला पाठिंबा दिला असून जेडी(एस) पक्षाचे कुमारस्वामी सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

बंगळुरू-  दलित असल्यामुळेच तब्बल तीनवेळा मुख्यमंत्रीपद नाकारले असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी केला आहे. जी परमेश्वर यांच्या आरोपामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत सापडली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने जेडी(एस)ला पाठिंबा दिला असून जेडी(एस) पक्षाचे कुमारस्वामी सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातल्याच एका दिग्गज दलित नेत्याने केलेल्या आरोपांमुळे काँग्रेस अडचणीत आली आहे. दावणगिरीत एका कार्यक्रमात बोलताना परमेश्वर यांनी हा आरोप केला असून ते म्हणाले की, तीन वेळा मला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती, मात्र केवळ दलित असल्यामुळे मला ती संधी देण्यात आली नाही. काँग्रेस पक्षात काही लोक दलितांना वर जावू देत नाहीत.

दरम्यान, परमेश्वर यांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी मात्र हात झटकले आहेत. असं केव्हा झालं असेल असं मला माहित नाही. त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा असं त्यांनी स्पष्ट केले आहे. बसवलिंगप्पा, केएच रंगनाथ, मल्लिकार्जुन खर्गे यांनाही मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही. फक्त राजकीय स्तरावरच नाही तर नोकऱ्यांमध्येही पदोन्नतीसाठी दलितांवर अन्याय होतो. आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र पण त्याचा फारसा फरक पडलेला नाही. नोकरीत भेदभाव झाल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी आत्महत्याही केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Was denied CM post thrice because I am Dalit says Karnataka Deputy CM G Parameshwara