पार्थ चॅटर्जींनी LIC मध्ये गुंतवले पैसे; अर्पिता मुखर्जीच्या पॉलिसीत झाले नॉमिनी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arpita mukherjee

पार्थ चॅटर्जींनी LIC मध्ये गुंतवले पैसे; अर्पिता मुखर्जीच्या पॉलिसीत झाले नॉमिनी!

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्यात आत्तापर्यंत ईडीनं कोट्यवधीचं घबाड जप्त केलं आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरांमध्ये ईडीनं मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोनं जप्त केलं आहे. यानंतर आता पार्थ चॅटर्जी यांनी एलआयसी पॉलिसीतही पैसे गुंतवल्याचं समोर आलं आहे. (WB teachers recruitment scam Parth Chatterjee Nominee in Arpita Mukherjee many LIC policies)

हेही वाचा: Photos : एव्हरग्रीन गायक किशोर कुमार यांच्या जीवनातील न ऐकलेले किस्से

पार्थ चॅटर्जी हे अर्पिता मुखर्जीच्या ३१ एलआयसी पॉलिसींचे नॉमिनी असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ईडीच्या या एलआयसी पॉलिसी लागल्यानं हा नवा घोटाळा समोर आला आहे. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांनी १ जानेवारी २०१२ रोजी APA युटिलीटी सर्व्हिसेस या कंपनीत पार्टनरशीप असल्याचंही समोर आलं आहे. ईडीच्या चौकशीत हे देखील समोर आलंय की या पार्टनरशीप फर्मच्या नावे अनेक प्रॉपर्टी रोख रक्कम देऊन खरेदी केल्या आहेत.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांकडून सर्व कार्यकम रद्द; तातडीनं दिल्लीकडे रवाना!

दरम्यान, कोलकाताच्या विशेष पीएमएलए कोर्टानं पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना ५ ऑगस्टपर्यंत दोन दिवसाची ईडी कोठडी सुनावली. ईडीनं अर्पिता मुखर्जीच्या पहिल्या घरावर २२ जुलै रोजी छापा टाकला होता. या छाप्यात २१.९० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तसेच ५६ लाख रुपयांचं परदेशी चलन आणि ७६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले होते. त्यानंतर ईडीनं अर्पिताच्या दुसऱ्या घरावर छापा टाकला यामध्ये २८.९० कोटी रुपये आणि ५ किलो सोनं आणि इतर कागदपत्रे जप्त केली होती.

Parth Chatterjee_Arpita Chatterjee

Parth Chatterjee_Arpita Chatterjee

Web Title: Wb Teachers Recruitment Scam Parth Chatterjee Nominee In Arpita Mukherjee Many Lic Policies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..