जेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

अरुण जेटली यांना कर्करोगाचे निदान झाल्याचे समजते. त्याच्या उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले. त्यामुळे ते एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्‍यता कमी आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व कॉंग्रेस पक्ष ते या आजारातून लवकर बरे होवोत, अशी शुभकामना व्यक्त करतो, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

अरुण जेटली यांना कर्करोगाचे निदान झाल्याचे समजते. त्याच्या उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले. त्यामुळे ते एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्‍यता कमी आहे. 

भाजपची राष्ट्रीय परिषद दिल्लीत झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीच्या मध्यरात्री जेटली तातडीने अमेरिकेला रवाना झाले. त्यांच्या या विदेश दौऱ्याबद्दल भाजपमधून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जेटली न्यूयॉर्कच्या एका प्रसिद्ध रुग्णालयात उपचारांसाठी गेल्याचे समजते. त्यांचे आजारपण व त्यावरील उपचारांसाठी लागणारा वेळ याबद्दल धूसरता असल्याने मोदी सरकारच्या वर्तमान कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प जेटली सादर करू शकतील काय, याबद्दलही अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. सरकारी गोटातून याबद्दल कमालीची गुप्तता पाळली गेली आहे. एका विशिष्ट परिस्थितीत माजी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्यावर ही जबाबदारी येऊ शकते, असे समजते. 

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जेटलींना मांडीतील पेशींचा कर्करोग झाला आहे. जेटली यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही जेटली यांच्या प्रकृती अस्वसाथ्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गांधी यांनी म्हटले की "जेटली यांच्या आजारपणाबाबत ऐकून आपण व्यथित झालो आहोत.''

Web Title: We are 100% with you Rahul Gandhi sends some love to ailing Arun Jaitley