esakal | भाजपने सोडला 'बाण'; शिवसेना एनडीएतून बाहेर 

बोलून बातमी शोधा

bjp

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन आघाडी उदयास येत आहे. अशातच आज 'एनडीए'च्या घटकपक्षांची बैठक झाली. पण या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती. त्यामुळे भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी आज शिवसेना एनडीएतून बाहेर पडत असल्याची अधिकृत घोषणा केली. शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीला जाणार असून, ते काँग्रेस नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजपने सोडला 'बाण'; शिवसेना एनडीएतून बाहेर 
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नवी दिल्लीत बोलावलेल्या 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने आज (रविवार) अखेर भाजपने शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आली. भाजप- शिवसेना युतीला अधिकृत तडा गेला असून, शिवसेना आता विरोधी बाकांवर बसणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन आघाडी उदयास येत आहे. अशातच आज 'एनडीए'च्या घटकपक्षांची बैठक झाली. पण या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती. त्यामुळे भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी आज शिवसेना एनडीएतून बाहेर पडत असल्याची अधिकृत घोषणा केली. शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीला जाणार असून, ते काँग्रेस नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असल्याने शिवसेनेचे खासदार "एनडीए'च्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. राऊत यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केले होते. सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही दिल्लीत बैठक होईल. या बैठकीलाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. आधी उद्धव या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; पण  बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्याने तेही या बैठकीला जाणार नाहीत. सोनिया गांधी व शरद पवार किमान समान कार्यक्रम ठरवतील अशी माहिती आहे.

बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा

राज्यातील सत्तेसाठी तीन पक्षांची मोट बांधण्याची प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेने "एनडीए'मधून सर्वप्रथम बाहेर पडावे अशी मागणी कॉंग्रेसने केली होती, त्यानुसार शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. आता "एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहिली नसल्याने युतीला तडा गेला आहे. भाजप आणि शिवसेना यांची 30 वर्षांची युती संपुष्टात आली आहे.