esakal | सरकार शेतकऱ्यांशी चर्चेला तयार, पण अमित शहांनी घातली अट
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah.

नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी (Amit Shah On Farmers Protest) आवाहन केले आहे.

सरकार शेतकऱ्यांशी चर्चेला तयार, पण अमित शहांनी घातली अट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी (Amit Shah On Farmers Protest) आवाहन केले आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवर आणि रस्त्यावर वेगळ्या वेगळ्या कृषी संघटनेच्या आवाहनानंतर जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की भारत सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यात तयार आहे, असं अमित शहा म्हणाले आहेत. 

3 डिसेंबर रोजी चर्चेसाठी कृषीमंत्र्यांनी निमंत्रण पाठवले आहे. भारत सरकार शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या आणि मागणीवर विचारविमर्श करण्यासाठी तयार आहे. जर शेतकऱ्यांना वाटतं की लवकरात लवकर चर्चा व्हाही, तर 3 डिसेंबर आधी चर्चा करता येईल. माझे तुम्हाला आश्वासन आहे की, जेव्हा तुम्ही निश्चित केलेल्या जागी स्थलांतरित व्हाल, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भारत सरकार तुमच्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तयार राहिल, असं अमित शहा म्हणाले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलू; योगी आदित्यनाथ गरजले

शाह म्हणाले की, तुम्ही जर रस्त्याच्या कडेला निश्चित केलेल्या जागेवर लोकशाही पद्धतीने शांततेने आंदोलन-निदर्शने कराल, तर त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सर्व सामान्य जनतेलाही त्रास होणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेवर शेतकरी बंधू आपल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये इतक्या कडाक्याच्या थंडीत खुल्यामध्ये बसले आहेत. मी तुमच्या सर्वांना आवाहन करतो की दिल्ली पोलिस सर्वांना एका मोठ्या मैदानात स्थलांतरित करण्यास तयार आहे. जेथे तुम्हाला सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा मिळतील.

तोमर, खट्टर यांचे आवाहन

आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेसाठी सरकार कधीही तयार असून शेतकऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढावा व आंदोलन समाप्त करावे असे आवाहन कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज पुन्हा केले. आंदोलकांच्या मागे असलेल्या राजकीय पक्षांनी स्वतःच्या नावाने राजकारण करावे ; शेतकऱ्यांच्या नावाने नव्हे, असेही ते म्हणाले. भाजपने या आंदोलनात समाजविघातक प्रवृत्ती घुसल्याचा आरोप केला आहे. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या आंदोलनातील एका व्हिडीओचे उदाहरण दिले व ठोस पुरावे मिळाल्यावर याबद्दल विस्ताराने बोलू असे सांगितले.

PM मोदींच्या सीरम भेटीनंतर आदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान,‘चलो दिल्ली’ च्या आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी जमले असून सीमेवरच आंदोलन केले जात आहे. शेतकरी संघटना, दिल्ली पोलिस आणि सरकार यांच्यात सकारात्मक तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी सीमा न सोडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता दररोज सकाळी संघटनांच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यात त्या दिवसाची रणनिती आखली जाणार आहे.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तैनात असलेल्या शेकडो पोलिस व निमलष्करी जवानांसाठीही आंदोलकांनी काल व आज या लंगरमध्ये भोजनाची व्यवस्था केली. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे अमृतसरचे खासदार गुरजीतसिंग औजला व लुधियानाचे खासदार रवनीतसिंग बिट्टू व दिल्लीतील काही नेते आज सायंकाळी टीकरी येथे पोहोचले. आज दुपारी शेतकरी संघटनांची बैठक झाल्यावर भारतीय शेतकरी संघटना, पंजाबचे सरचिटणीस हरिंदरसिंग म्हणाले ,की येथून कोठेही हटणार नाही असा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. आम्ही कोठेही जाणार नाही व येथेच राहून आंदोलन जारी ठेवू. दररोज सकाळी ११ वाजता संघटनांच्या नेत्यांच्या बैठकीत त्या त्या दिवसाची रणनीती आखण्यात येईल.

loading image