आम्ही जनावरं नाही, मग अशी वागणूक का?; मेहबूबांच्या मुलीचं पत्र 

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनाही सरकारने ताब्यात घेतलं आहे. याचदरम्यान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. इल्तिजा जावेदने या संदेशात म्हटलं आहे की, आई मेहबूबा यांना अटक केल्यानंतर काही दिवसांपासून आम्हाला घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. इल्तिजाने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्या मीडियाशी बोलण्यावरुन धमकविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनाही सरकारने ताब्यात घेतलं आहे. याचदरम्यान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. इल्तिजा जावेदने या संदेशात म्हटलं आहे की, आई मेहबूबा यांना अटक केल्यानंतर काही दिवसांपासून आम्हाला घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. इल्तिजाने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्या मीडियाशी बोलण्यावरुन धमकविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरेन्सचे ओमर अब्दुला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 4 ऑगस्टला रात्री उशीरा त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, इल्तिजाने सांगितले की, अनेक काश्मिरींना जनावरासारखं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे. मी जर मीडियाशी बोलली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, गेल्या सोमवारी मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are treated like animals; Letter to home minister of Mehbooba Mufti daughter