भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू| Omicron | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Omicron Marathi News Updates

भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

नवी दिल्ली - देशात मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉन (Omicron Death) विषाणू पसरत असून गेल्या काही दिवसात कोरोना (Corona Cases In India) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेच भर पडली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये मृत्यू झालेल्या 72 वर्षीय रूग्णाचा मृत्यू ओमिक्रॉनमुळेच झाल्याचे मानण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (First Death Of Omicron Recorded In India )

हेही वाचा: मी जिवंत परतू शकलो; मुख्यमंत्र्यांना आभारी आहे म्हणून सांगा; PM मोदींचा खोचक टोला

राजस्थानच्या जयपूरमध्ये मृत्यू झालेला ७२ वर्षीय रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron Positive) निघाला होता, त्यानंतर त्याची चाचणी निगेटिव्ह आली. परंतु इतर आरोग्यसंबंधीच्या गुंतागुंतीमुळे हा रूग्ण रुग्णालयात दाखल होता. ओमिक्रॉनची लागण झाल्यापासून हा रूग्ण रुग्णालयात दाखल असल्यामुळे हा मृत्यू ओमिक्रॉनचाच मानला जाईल असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (Omicron First Death In Rajasthan)

हेही वाचा: भारत बायोटेकच्या इंट्रानेझल व्हॅक्सीन चाचणीला DGCI ची परवानगी

बुधवारी भारतात ओमिक्रॉन (Active Corona Cases In India) बाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 58,097 नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली असून देशातील एकूण बाधितांची संख्या 35,018,358 वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही 2 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या संपूर्ण देशात एकूण सक्रिय रूग्णांची संख्या 214,004 इतकी आहे. आतापर्यंत 34,321,803 लोकांनी कोरोनावर मात केली असून, देशात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 534 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात एकूण 482,551 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Corona Vaccination In India)

Web Title: We Consider That Death Of Omicron In India Says Health Ministry Sources

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Omicron Variant
go to top