राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे - टोपे

राज्यातील कोरोना रूग्णांच्या अनुशंगाने टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय
Rajesh Tope Statement on Lockdown
Rajesh Tope Statement on Lockdownsakal

मुंबई - राज्यात येथून पुढे कोरोना नियमांच्या अनुशंगाने नागरिकांसाठी सात दिवसांचे विलगीकरण (Corona Quarantine Period ) सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीमध्ये वाढणारी कोरोना रूग्णसंख्या कशाप्रकारे रोखता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. येत्या काळात राज्यातील कोरोना रुग्णसांख्य वाढत जाणार असल्याने, टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून, सध्या राज्याची पावणे दोन लाख कोरोना टेस्टिंग करण्याची क्षमता असल्याचे सांगत ते म्हणाले की, अँटिजेन टेस्टवर मोठ्या प्रमाणावर भर देण्याची गरज लागणार आहे. सध्या लॉकडाऊनची आज गरज नाही, पण रुग्णसंख्या पाहून निर्बंध लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Seven Days Quarantine In Maharashtra )

Rajesh Tope Statement on Lockdown
सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप; महानुभव पंथाप्रमाणे अंत्यसंस्कार

राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता उद्या 25 ते 30 हजार रूग्ण (Corona Cases In Maharashtra) आढळून येऊ शकतात अशी भीती देखील राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अँटिजेन टेस्टचा (Antigen Test) रेकॉर्ड ठेवण्यासाठी लवकरच यंत्रणा उभारणार असल्याचे टोपे म्हणाले. सध्याच्या परिस्थीत 100 टक्के लॉकडाऊनची आवश्यकता नसून, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या आणि ज्यांची गरज नाही त्या थांबवता येतील का? याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. वाढत्या रूग्णसंख्येला जर थांबवायचे असल्यास ज्या ठिकाणी गर्दी होत आहे ती थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.

दरम्यान, जो काही निधी दिला तो खर्च केला जाईल असे सांगत आता पर्यंत 70 आमदार आणि 10 ते 15 मंत्री कोरोना बाधित झाल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड तर, थुंकणाऱ्यांवर 1000 रुपये दंड करावा अशा सूचना देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी दिल्या आहेत. (Need To Fallow Covid Rules) ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही, अशांसाठी कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मात्र, त्यातील 90 टक्के रूग्णांना लक्षणे नाहीत ही समाधानकारक बाब असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. 10 टक्क्यांमध्ये 1-2 टक्के रूग्णांना रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केेले जात आहे.

Rajesh Tope Statement on Lockdown
टास्क फोर्सची बैठक संपली, आज रात्रीपासून राज्यात नवी नियमावली?

राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Lockdown news) राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. (Maharashtra Mini Lockdown News)

राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याच्या सरकार विचारात नाही(Maharashtra Lockdown Updates)

- लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार

- राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता

- शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता

- दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता

- राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध

- आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी

- मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com