आम्ही तीन लग्न करून बायकांना मान देतो, तुम्ही तर...; MIM नेत्याचं वादग्रस्त विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaukat Ali

आम्ही तीन लग्न करून बायकांना मान देतो, तुम्ही तर...; MIM नेत्याचं वादग्रस्त विधान

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये राजकीय स्पेस तयार निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे उत्तर प्रदेश राज्याचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी वादग्रस्त विधान केले आहे. एका मेळाव्याला संबोधित करताना शौकत अली यांनी तीन लग्नांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. (AIMIM news in Marathi)

हेही वाचा: ISRO: दिवाळीत भारताच्या सर्वात वजनदार 'रॉकेट'चं लॉंचिंग; सोबत ३६...

शौकल अली म्हणाले की, आम्ही तीन लग्न केले तरी तिन्ही पत्नींना समाजात मान देतो. इतर धर्मांची खिल्ली उडवत अली म्हणाले की, तुम्ही लग्न झाल्यानंतर आणखी तीन महिलांशी संबंध ठेवता. तुम्ही ना पत्नीला मान देता, ना संबंध ठेवलेल्या त्या इतर स्त्रियांना माद देता. आम्ही लग्न करून बायका घरात आणतो. त्यांना सन्मान देतो. तसेच आमच्या मुलांची नावे रेशनकार्डवर टाकतो, असही शौकत अली म्हणाले.

हेही वाचा: Video : सोशल मीडियावर परदेशी पाहुण्यांच्या हनुमान चालीसेची धूम; तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध

शौकत अली यांनी हिजाब बंदीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. देशात कोणी काय घालायचे हे संविधान ठरवेल, हिंदुत्व नाही. मात्र भारतीय जनता पक्ष असे मुद्दे उपस्थित करून देश तोडण्याचे काम करत आहे. भाजपवर हल्लाबोल करताना शौकत अली म्हणाले की, मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे.