Umesh Pal Murder : आमची कोणतीही एन्काऊंटर पॉलिसी नाही; उमेश पाल हत्याकांडावर पोलिसांचं स्टेटमेंट

Crime News
Crime Newssakal

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशमध्ये उमेश पाल हत्याकांडानंतर सध्या तणावाची परिस्थिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांचं एन्काऊंटर झालेलं आहे. अतिक अहमदचा मुलगा असद हासुद्धा याप्रकरणी आरोपी आहे. त्याचा तपास सध्या पोलिस करीत आहेत.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी आज याप्रकरणी एनडीटीव्हीला माहिती दिली. ते म्हणाले की, पोलिस या प्रकरणात दोषी असलेल्या कुणालाही सोडणार नाही. पोलिस कायद्याच्या अनुषंगानेच कारवाई करत असून एन्काऊंटर ही पोलिसांची पॉलिसी नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचाः परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

उमेश पाल हत्याकांडामध्ये सहभागी असलेला विजय उर्फ उस्मान हा सोमवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये मारला गेला. प्रयागराजच्या काँधियारा ठाण्याच्या परिसरामध्ये क्राईम ब्रांचची टीम आणि आरोपी उस्मान यांच्यात चमकम झाली. यामध्ये उस्मानला गोळी लागली.

Crime News
China CCTV : भारतातल्या प्रत्येक हालचालींवर चीनची नजर; देशातले 10 लाख सीसीटीव्ही कॅमेरे...

पोलिस कायदेशीरदृष्टीने कारवाई करत आहेत. आमची कसलीही एन्काऊंटर पॉलिसी नाही. पोलिस स्वरक्षणासाठी गोळ्या झाडत आहेत. आम्ही जी करवाई करत आहोत ती उमेश पालच्या पत्नीच्या तक्रारीवरुन करत आहोत. आम्ही कुणालाच सोडणार नाहीत. आम्ही जे काही करत आहोत ते कोर्टात सिद्ध करु, असंही एडीजी प्रशांत कुमार म्हणाले.

आणखी एकाला मारलं जाणार- रामगोपाल यादव

समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी मोठं विधान केलं आहे. रामगोपाल यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार सपा महासचिव राम गोपाल यादव यांनी सांगितलं की, पोलिसांना खरे आरोपी सापडत नाहीत, त्यांच्यावर वरुन दबाव आहे. ते जो सापडेल त्याला मारतील. अतिक अहमदचे दोन मुलं आहेत. त्यापैकी एकाला एक-दोन दिवसांमध्ये मारलं जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com