'आपल्याला जवानांना दगडं मारण्याइतकं स्वातंत्र्य'

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

''देशात इतके स्वातंत्र्य आहे, की लष्करप्रमुखांविरोधात बोलता येऊ शकते. इतकेच नाहीतर सैनिकांवरही दगडफेक करता येऊ शकते. याशिवाय अजून किती स्वातंत्र्य हवे आहे?'' 

- अनुपम खेर, अभिनेते

मुंबई : समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. त्यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत आहे, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी काल (गुरुवार) केले होते. त्यांच्या या विधानानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''देशात इतके स्वातंत्र्य आहे, की लष्करप्रमुखांविरोधात बोलता येऊ शकते. इतकेच नाहीतर सैनिकांवरही दगडफेक करता येऊ शकते. याशिवाय अजून किती स्वातंत्र्य हवे आहे?'' 

नसीरूद्दीन शहा यांनी केलेल्या विधानानंतर देशभरातील विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शहा यांनी त्यांच्या मुलांना देशात ठेवायला भीती वाटत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अनुपम खेर यांनी यावर सांगितले, की ''आपल्या देशात थेट लष्करप्रमुखांविरोधात बोलता येऊ शकते. सैनिकांवर दगडफेक करता येऊ शकते. लष्कराबाबत अपशब्द बोलता येऊ शकते. एवढे सगळं स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. मग आणखी किती स्वातंत्र्य हवे आहे? जे काही बोलायचे होते त्यांनी बोलले. मात्र, याचा अर्थ हा नाही की ते सगळं बरोबरच असेल''.   

दरम्यान, नसीरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यावर टीका केली जात असताना अभिनेत्री ऋचा चड्डा आणि स्वरा भास्कर यांनी सोशल मीडियावरून ट्विट करत शहा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.

Web Title: We have the freedom to stone the jawans says Anupam Kher