'आरबीआय'कडे निधीची मागणी केलेली नाही : गर्ग

'आरबीआय'कडे निधीची मागणी केलेली नाही : गर्ग

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेकडे (आरबीआय) 3.6 लाख कोटी रुपयांच्या निधीची मागणी केलेली नसून, बॅंकेला योग्य आर्थिक भांडवली चौकट निश्‍चित करण्याची केवळ चर्चा सुरू आहे, असा खुलासा केंद्र सरकारने शुक्रवारी केला. 

याविषयी बोलताना केंद्रीय आर्थिक कामकाज सचिव सुभाष चंद्र गर्ग म्हणाले, ""प्रसारमाध्यमांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात चुकीची चर्चा सुरू आहे. सरकारचे वित्तीय गणित योग्य मार्गावर आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे 1 लाख कोटी अथवा 3.6 लाख कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी सरकारकडून करण्यात आलेली नाही. सरकारी पातळीवर केवळ बॅंकेला योग्य आर्थिक चौकट आखण्याबाबत चर्चा करण्यात येत आहे.'' 

""चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 3.3 टक्‍क्‍यांपर्यंत ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट 2013-14 या आर्थिक वर्षात 5.1 टक्के होते. हे उद्दिष्ट 2014-15 पासून खाली आणण्यात सरकारने यश मिळविले आहे. चालू आर्थिक वर्षात ते 3.3 टक्‍क्‍यांपर्यंत राहील, असा सरकारला विश्‍वास आहे. याचबरोबर सरकारने अर्थसंकल्पीय कर्ज 70 हजार कोटी रुपयांनी कमी केले आहे,'' असे गर्ग यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com