esakal | मोदी सरकारच्या या निर्णयाचे पी. चिदंबरम यांच्याकडून स्वागत

बोलून बातमी शोधा

Modi  Government, Congress,P Chidambaram

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही ठराविक स्थानकादरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वपदावर येण्यासाठी महत्त्वपूर्ण पाउल असल्याचे सांगत चिदंबरम यांनी रस्ते वाहतूक आणि विमान सेवा सुरु करण्याबाबतचा सल्ला मोदी सरकारला (Modi  Government) दिलाय.  

मोदी सरकारच्या या निर्णयाचे पी. चिदंबरम यांच्याकडून स्वागत
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही ठराविक स्थानकादरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वपदावर येण्यासाठी महत्त्वपूर्ण पाउल असल्याचे सांगत चिदंबरम यांनी रस्ते वाहतूक आणि विमान सेवा सुरु करण्याबाबतचा सल्ला मोदी सरकारला (Modi  Government) दिलाय.  

राजधानी रेल्वे मंगळवारपासून

P Chidambaram  यांनी एका ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, प्रवासी रेल्वे वाहतूक (passenger trains) सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. ज्या प्रमाणे रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी पाउल उचलण्यात आले आहे अगदी त्याप्रमाणे रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकही सुरु करावी, असा उल्लेख चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. कोलमडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी रस्ते, रेल्व आणि हवाई वाहतूक सेवा सुरु करणे महत्त्वपूर्ण आहे.

भारताचा जीडीपी शून्यावर जाणार; काळजी व्यक्त करणारा अहवाल
 
भारतीय रल्वेने रविवारी ठप्प रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. 12 मे पासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ठरावीक मार्गावर मोजक्या ट्रेन धावणार आहे. अप आणि डाउन अशा एकूण 30 रेल्वे गाड्या या टप्प्यात सुरु करण्यात येतील. आरक्षित तिकीट बुकींग करणाऱ्या प्रवाशांनी एक तास अगोदर रेल्वे स्थानकावर यावे लागेल, अशी सूचना देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

लॉकडाउनच पुढं काय? 

कोरोना विषाणूच्या (coronavirus) वेगाने होणाऱ्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईसह अन्य रेल्वे सेवा दिर्घ काळासाठी ठप्प झाली आहे. रेल्वेसह रस्ते आणि विमान वाहतूकही पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पहिल्या दोन टप्प्यातील कठोर निर्बंधानंतर आता हळू हळू वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात आहे. रेल्वे प्रमाणेच  योग्य ती खबरदारी घेऊन रस्ते वाहतूक आणि विमान सेवाही पूर्वपदावर आणण्याबाबत विचार करावा, अशी सूचना Congress  नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.