मंत्रिमहोदय म्हणतात, 'तोंडी तलाकवरील कायदा आम्ही स्वीकारणार नाही'

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्याने मला दु:ख वाटत आहे. हा इस्लामवरील हल्ला आहे. त्यामुळे आम्ही तोंडी तलाकवरील कायदा स्वीकारणार नाही.

- सिद्दीकुल्लाह चौधरी, मंत्री, पश्चिम बंगाल

कोलकाता : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर हा कायदा देशभरात लागू झाला. मात्र, पश्चिम बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी यावर विरोध दर्शवला आहे. तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्याने मला दु:ख वाटत आहे. हा इस्लामवरील हल्ला आहे. त्यामुळे आम्ही तोंडी तलाकवरील कायदा स्वीकारणार नाही.

सिद्दीकुल्लाह चौधरी हे ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असून, 'जमियत उलेमा-ए-हिंद'चे अध्यक्ष आहेत. तोंडी तलाकवर ते म्हणाले, केंद्रीय समितीची बैठक झाल्यास आम्ही पुढील कारवाईचा विचार करणार आहोत. तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्याने मला दु:ख वाटत आहे. हा इस्लामवरील हल्ला आहे. त्यामुळे आम्ही तोंडी तलाकवरील कायदा स्वीकारणार नाही. 

दरम्यान, तोंडी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर विविध स्तरातून याचे स्वागत केले जात आहे. मात्र, चौधरी यांनी हे वक्तव्य केल्याने ममता बॅनर्जी यावर काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will not accept the law on Triple Talaq says Siddiqullah Chowdhury