'भाजप हटाओ, देश बचाओ'; ममता बॅनर्जींचा नारा

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

15 ऑगस्ट म्हणजेच, येणाऱ्या स्वातंत्र्यदिनापासून 'भाजप हटाओ देश बचाओ' ही मोहीम सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात राबवणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. त्या पक्षाच्या एका वार्षिक कार्यक्रमात बोलत होत्या.

कोलकाता - 15 ऑगस्ट म्हणजेच, येणाऱ्या स्वातंत्र्यदिनापासून 'भाजप हटाओ देश बचाओ' ही मोहीम सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात राबवणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. त्या पक्षाच्या एका वार्षिक कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी पक्षाची रणनीती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकात भाजपसाठी हा एक मोठा धक्का असेल. देशात हिंसाचाराच्या घडत असलेल्या घटना थांबवण्यातही भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशात हिंसाचाराच्या घटना अशाच चालू राहिल्या तर आपला देशही तालिबानप्रमाणे बनेल.

भारतीय जनता पक्षामध्ये आणि आरएसएसमध्ये काही चांगले लोकही आहेत ज्यांचा मी आदर करते. परंतु, काहीजण हे खुप चुकीच्या पद्धतीचे राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: We will start BJP hatao, desh bachao campaign says Mamata Banerjee