अमेरिकन सैन्याने अफगणिस्तानात सोडलेली शस्त्रे पोहोचली दहशतवाद्यांकडे?

jammu and kashmir
jammu and kashmiresakal

जम्मू-काश्मीर : अफगाणिस्तानातून (afghanistan) अमेरिकन सैन्याच्या (american army) मायदेशी परतीचा परिणाम भारतातील काश्मीरमध्ये (jammu and kashmir) दिसू लागला आहे. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून परतताना जी शस्त्रे सोडली होती, ती आता तालिबान विकत असल्याचे मानले जात आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते ही शस्त्र चीन (china) आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून (ISI) खरेदी केले जात आहे. काश्मीरमध्ये पाठवल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांना आयएसआय ही शस्त्रे देत आहे. सोशल मीडियावर पीपल्स अँटी फॅसिस्ट फोर्स (PAFF) या स्थानिक काश्मिरी दहशतवादी संघटनेच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये याचे संकेत मिळाले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये धक्कादायक खुलासा

व्हायरल व्हिडीओमध्ये दहशतवादी अमेरिकेत बनवलेली शस्त्रे आणि दारूगोळा वापरताना दिसत आहेत. इतकेच नाही तर दहशतवादी संघटनेने आपल्या काही दहशतवाद्यांचे शस्त्रास्त्रांसह फोटोही अपलोड केले आहेत. पूंछमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यात 9 लष्करी जवान शहीद झालेल्या हल्ल्यात त्यांनी याचा वापर भारतीय लष्कराविरुद्ध केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, या व्हिडिओमध्ये दहशतवादी M249 ऑटोमॅटिक रायफल्स, 509 टॅक्टिकल गन, M1911 पिस्तूल आणि M4 कार्बाइन असॉल्ट रायफल वापरताना दिसत आहेत. अमेरिकन लष्करही या सर्व शस्त्रांचा वापर करत आहे.

काश्मीरमधील दहशतवाद्यांना मिळताएत अमेरिकन बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे?

ज्या वेळी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले होते आणि परतले होते, तेव्हा संरक्षण तज्ज्ञांनी असे संकेत दिले होते की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीचा काश्मीरमधील परिस्थितीवर नक्कीच परिणाम होईल. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने काश्मीरमधील दहशतवाद्यांना अमेरिकन बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत जे अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याने सोडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले तेव्हा 80 दशलक्ष डॉलर्सची शस्त्रे शिल्लक होती. यात रायफल, मशीनगन, पिस्तूल, ग्रेनेड लॉन्चर आणि आरपीजी यांसारख्या 6 लाखांहून अधिक अत्याधुनिक लहान शस्त्रे आहेत. याशिवाय टेहळणी उपकरणे, रेडिओ यंत्रणा, ड्रोन, नाईट व्हिजन गॉगल आदींचाही या सर्वांमध्ये समावेश आहे.

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तालिबानकडून विक्री

नार्कोटरर या दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली शस्त्रे संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे की, तालिबानने आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आता सर्व शस्त्रे काबूल आणि आसपासच्या भागात विक्रीसाठी ठेवली आहेत. ती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि चीनने विकत घेतली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तान ते पुरवतो.

सुरक्षा दलांसाठी चिंतेचा विषय

ब्रिगेडियर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, भारतात कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांचे मास्टर्स ही शस्त्रे खरेदी करण्यासाठी नार्कोटररकडून मिळालेल्या पैशाचा वापर करत आहेत. यामुळे काश्मीरमधील दहशतवादी समीकरण पुन्हा एकदा बदलले असून दहशतीची आग आणखी तीव्र होऊ लागली आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, अलीकडेच दहशतवाद्यांकडून अमेरिकेने बनवलेल्या असॉल्ट रायफल्स जप्त करणे सुरक्षा दलांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशी शस्त्रे त्या दहशतवाद्यांना धार देतात.

jammu and kashmir
राज्यात थंडी वाढणार, मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता

सुरक्षा दलांसाठी नवे आणि मोठे आव्हान

ब्रिगेडीयर म्हणतात, दोन आठवड्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे अमेरिकन शस्त्रे सापडली. या वर्षाच्या पहिल्या दोन आठवड्यात सुरक्षा दलांनी 14 दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यापैकी 6 पाकिस्तानी दहशतवादी होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून यूएस बनावटीच्या एम 4 कार्बाइन असॉल्ट रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, दहशतवाद्यांकडे अशी अत्याधुनिक शस्त्रे असणे हे सुरक्षा दलांसाठी नवे आणि मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता भारतीय लष्करानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांना दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकन बनावटीची सिग सॉअर 716 रायफल्स आणि सिग सॉअर एमपीएक्स 9 मिमी पिस्तूल मिळत आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिस हे देशातील पहिले पोलिस दल बनणार आहे ज्यांच्याकडे अशी अत्याधुनिक शस्त्रे आहेत ज्यांच्या मदतीने ते दहशतवादाचा अधिक मजबूतपणे मुकाबला करेल आणि त्यांचा नायनाट करेल.

jammu and kashmir
देश वाचवायचा असल्यास भाजपला सत्तेत आणावं लागेल; मुलायम सिंह यांची सून मैदानात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com