Weather update : आज 'या' राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा; उत्तर भारतात थंडीचा कडाका, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update
Weather UpdateEsakal

देशाची राजधानी दिल्लीत आता थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे दिल्लीत थंड वारे आहेत. उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या या वाऱ्यांचा वेग सोमवारी वाढला आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ थंडीचा कडाका जाणवत आहे. सोमवारी दिल्लीत किमान तापमान 7.1 नोंदवले गेले. दिल्लीत पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहील.

हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह उत्तरेकडील सर्वच राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. डोंगराळ प्रदेशात बर्फवृष्टी सुरू असल्यानं त्याचा परिणाम म्हणून मैदानी प्रदेशातील तापमानात प्रचंड घट झाली आहे.(Latest Marathi News)

Weather Update
Tamil Nadu Rain : दक्षिण तमिळनाडू अतिवृष्टीमुळे जलमय

तर आज दिल्लीत किमान तापमान 6 अंशांच्या आसपास असू शकते. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतातील भागात थंडी वाढत आहे. डोंगराळ भागात सुरू झालेल्या हिमवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी आणखी वाढली आहे. त्याचवेळी दक्षिण भारतात पाऊस सुरूच आहे. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार आज, दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस कमी होईल पण लक्षद्वीपमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे.(Latest Marathi News)

उत्तर तामिळनाडू, उत्तर केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकच्या दक्षिण किनारपट्टीवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये किमान तापमानात किंचित घट होईल. नुकत्याच झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू-काश्मीरच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे.

Weather Update
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना पुन्हा समन्स, गुरुवारी चौकशीला बोलावलं

तामिळनाडूत अवकाळी पावसाचा हाहाकार

तामिळनाडूत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. IMDच्या माहितीनुसार, मागील २४ तासात तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं अनेकघरे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने आज देखील तामिळनाडूत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.(Latest Marathi News)

महाराष्ट्रात कशी असेल परिस्थिती?

महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडं राहणार असून, थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. राज्यातील अनेक शहरांमधील तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Marathi Tajya Batmya)

Weather Update
मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका; केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com