Weather Update : केरळात धुवाधार ; 'या' आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

केरळात धुवाधार ; 'या' आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट
केरळात धुवाधार ; 'या' आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्टsakal

परतीच्या पावसाला काही दिवस राहिले असतानाच पुन्हा एकदा केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय झाला आहे. गुरूवारी(ता. २१) दिवसभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शिवाय आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात आणि लक्षद्वीपला संततधार सुरू असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागने (IMD) दिली आहे. मच्छीमारांना केरळ राज्यात समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या केरळ (Kerala) राज्यात पावसानं थैमान घातलंय, तर हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.

या आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

केरळमध्ये पटनमथिट्टा, कोट्टायम, इडुक्की, पलक्कड़, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूर या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा, एर्नाकुलम, त्रिशूर आणि कासरगोड या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.

असा असतो अलर्ट

24 तासांमध्ये 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त मुसळधार ते अतिवृष्टीचा पाऊस रेड अलर्टचा संकेत देतो. तर, ऑरेंज अलर्टमध्ये 24 तासात 6 सेंमी ते 20 सेंटीमीटरपर्यंत पाऊस होतो. यलो अलर्ट मध्ये 6 ते 11 सेमी इतका पाऊस पडतो.

केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय

राज्यात जोरदार पाऊस झाला असून पलक्कड़ जिल्ह्यांतील परम्बिकुलममध्ये बारा सेंटीमीटर तर एर्नाकुलममध्ये एनामक्कल (त्रिशूर) आणि मन्नारक्कड़ (पलक्कड़) मध्ये अकरा सेमी एवढा पाऊस झाला आहे.असे हवामान खात्याने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com