'एलओसी'वरील शांततेचे स्वागत - पर्रीकर

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

आम्हाला पाकिस्तान आणि चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहे. त्यांच्यासोबत लढण्याचा प्रश्नच नाही. सीमेपलिकडून शांतता राखण्यात येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो.

बंगळूर - प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) असलेल्या शांततेचे आम्ही स्वागत करतो आणि भारताला पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायची इच्छा आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी नोव्हेंबरमध्ये सुत्रे स्वीकारल्यापासून एलओसीवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये घट झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना पर्रीकर यांनी हे वक्तव्य केले. मात्र, पर्रीकर यांनी कोणत्याही घटनेबाबत भारत सतर्क असल्याचेही सांगितले. 

पर्रीकर म्हणाले, की आम्हाला पाकिस्तान आणि चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहे. त्यांच्यासोबत लढण्याचा प्रश्नच नाही. सीमेपलिकडून शांतता राखण्यात येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. पण, याचा अर्थ असा काढू नये की आम्ही तयार नाहीत. 

Web Title: Welcome 'calm' on LoC, but prepared for any eventuality: Parrikar to Pak