मातृत्व रजेच्या विधेयकाचे पंतप्रधानांकडून स्वागत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्लीः संघटित क्षेत्रातील गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी रजा देण्याचे विधेयक मंजूर झाले, ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

"महिलांच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करीत असून, मातृत्व रजेसंबंधातील जुन्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग आहे,' असे ट्‌विट पंतप्रधानांनी केले आहे. गर्भवती महिलेला मिळणाऱ्या पगारी रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याच्या विधेयकाला गुरुवारी (ता. 9) लोकसभेत मंजुरी देण्यात आली. हे विधेयक राज्यसभेत नऊ महिन्यांपूर्वीच मंजूर झाले आहे. देशातील 18 लाख महिलांना याचा लाभ मिळू शकेल. या विधेयकामुळे माता व बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे प्रसूती रजेत वाढ करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. रजेच्या या दुरुस्तीमुळे महिलांना नोकरीत सुरक्षितता मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Welcome to the maternity leave of the bill PM