"सीएमए'च्या स्थापनेचे पलानीस्वामींकडून स्वागत 

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कावेरी जल व्यवस्थापन मंडळाची (सीएमए) स्थापना केली असून, तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज या निर्णयाचे स्वागत केले. हा अम्मा (जयललिता) सरकार व राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पलानीस्वामी म्हणाले, ""सीएमएच्या स्थापनेसाठी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी 1990 मध्ये उपोषण केले होते.

चेन्नई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कावेरी जल व्यवस्थापन मंडळाची (सीएमए) स्थापना केली असून, तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज या निर्णयाचे स्वागत केले. हा अम्मा (जयललिता) सरकार व राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पलानीस्वामी म्हणाले, ""सीएमएच्या स्थापनेसाठी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी 1990 मध्ये उपोषण केले होते.

अण्णा द्रमुकने यासाठी केलेले निरंतर प्रयत्न आणि दिलेल्या कायदेशीर लढ्यामुळे आज हे मंडळ अस्तित्वात आले. या रूपाने तमिळनाडू व त्यातील शेतकऱ्यांचा हक्क त्यांना परत मिळाला आहे.'' 

Web Title: Welcome from palaniswami CMA