esakal | जगाचे कल्याण हाच उद्देश : नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

quad-conference

हिंद-प्रशांत भागाची सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीसाठी ‘क्वाड’ गटातील देश अधिक सहकार्य करणार असून या प्रदेशाच्या विकासात हा गट एक आधारस्तंभ ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. तसेच, जगाच्या कल्याणासाठी सहकार्य हा या परिषदेचा अजेंडा असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

जगाचे कल्याण हाच उद्देश : नरेंद्र मोदी

sakal_logo
By
यूएनआय

नवी दिल्ली - हिंद-प्रशांत भागाची सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीसाठी ‘क्वाड’ गटातील देश अधिक सहकार्य करणार असून या प्रदेशाच्या विकासात हा गट एक आधारस्तंभ ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. तसेच, जगाच्या कल्याणासाठी सहकार्य हा या परिषदेचा अजेंडा असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान यांच्या ‘क्वाड’ (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग) गटाची पहिली शिखर परिषद आज व्हर्च्युअल पद्धतीने सुरु झाली. पंतप्रधान मोदींसह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी या परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे हाच या परिषदेचा हेतू आहे. लोकशाही मूल्य आणि मुक्त, खुल्या आणि सवर्वसमावेशक हिंद-प्रशांत प्रदेशासाठी क्वाड देश एकत्र आले आहेत. या परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुढाकार घेतल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. लसीकरण, पर्यावरण, तंत्रज्ञान हा परिषदेचा अजेंडा असल्याचेही मोदींनी सांगितले. ही परिषद म्हणजे ‘वसुधैव कुटुम्बकम’चाच एक भाग असून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही अधिक समन्वयाने प्रयत्न करणार आहोत, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. 

West Bengal Election: ममतादीदी व्हीलचेअरवरून थेट प्रचाराच्या मैदानात!

कोणालाही लक्ष्य करू नका : चीन
क्वाड परिषदेबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनने, या माध्यमातून कोणत्याही देशाला लक्ष्य केले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. संबंधित देश सर्वसमावेशकतेचे आणि सर्वांच्या कल्याणाचे मूल्य पाळतील, अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली.

हिंद-प्रशांत प्रदेशावर आंतरराष्ट्रीय कायद्याचा अंमल असावा आणि हा भाग संघर्षमुक्त असावा, यासाठी क्वाड देश कटिबद्ध राहणार आहेत. 
- ज्यो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

Edited By - Prashant Patil

loading image