esakal | West Bengal Election: ममतादीदी व्हीलचेअरवरून थेट प्रचाराच्या मैदानात!
sakal

बोलून बातमी शोधा

mamata

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं रुग्णालयानं सांगितलं असून काही दिवस त्यांना व्हिलचेअरच रहावं लागणार असल्याचंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. 

West Bengal Election: ममतादीदी व्हीलचेअरवरून थेट प्रचाराच्या मैदानात!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

West Bengal Assembly Election 2021: नंदीग्राममध्ये (Nandigram) प्रचारादरम्यान डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना कोलकाता येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना आज (शुक्रवार) रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं रुग्णालयानं सांगितलं असून काही दिवस त्यांना व्हिलचेअरच रहावं लागणार असल्याचंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ममतादीदींना व्हिलचेअरवरुनच प्रचार करावा लागणार आहे.

"कृषी कायदे मागे घेतले तर मोदी अधिक ताकदवान नेते म्हणून पुढे येतील"
 

 
ममता बॅनर्जी जखमी झाल्याने त्या प्रचार कसा करणार तसेच पश्चिम बंगालची जनता त्यांना कशाप्रकारे प्रतिसाद देते हे पाहावं लागणार आहे. यावरुनही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधकांनी ममता नाटक करत असल्याचं म्हटलं आहे तर तृणमूल काँग्रेसने ममतांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. दरम्यान, भाजपने निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी गांभीर्याने चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याची चौकशी व्हावी - रामदास आठवले
 

पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर


ममता बॅनर्जी जखमी झाल्याचा मुद्दा तापणार
  
नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ममतांचे जुने सहकारी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपाने नंदीग्राममधूनच उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपचं आव्हान स्विकारताना ममतांनी आपली नेहमीची भावानीपूरची जागा सोडून नंदीग्राम येथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता ममता बॅनर्जी जखमी झाल्याने निवडणुकीत हाच मुद्दा तापवत बंगालच्या जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, ममतांनी आपण पुढील प्रवास व्हिलचेअरवरुन करणार असल्याचं म्हटलं आहे. 

भाजपने संपूर्ण ताकद लावली पणाला

दरम्यान, बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून २७ मार्चपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यावेळी निवडणुकीत मुख्यत्वे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसी आणि भाजपमध्ये टक्कर होणार आहे. भाजपने पश्चिम बंगालसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पक्षाने मोठ्या संख्येने तृणमूलच्या नेत्यांना भाजपत आणण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा अशा दिग्गजांना प्रचारात उतरवलं आहे. 
 

loading image