

Mysterious Waves in Village Well
Esakal
Viral Video: एका विहिरीतलं पाण्याची समुद्राच्या लाटांप्रमाणे हालचाल होत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका गावातला असल्याचं सांगण्यात येतंय. शेतात असलेल्या या विहिरीतलं पाणी लाटांसारखे वर खाली होत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. आजूबाजूच्या विहिरींमध्ये आणि परिसरात पाणी पातळी आणि परिस्थिती सामान्य असल्यानं या विहिरीबाबत गूढ वाढलं आहे.