निवडणूक अधिकारी झोपला तृणमूल नेत्याच्या घरात; EVM मशिनही सापडलं

WB_Election_2021
WB_Election_2021

कोलकाता : एक निवडणूक अधिकारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात झोपल्याचे तसेच त्यावेळी त्याच्याकडे इव्हीएम मशिन असल्याचे उघड झाले. तपन सरकार असे त्याचे नाव असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. हा नेता आपला नातेवाईक असल्याचा त्याचा दावा आहे. त्याच्याकडील इव्हीएम, तसेच व्हीव्हीपीएटी ही दोन्ही मशिन राखीव होती, पण त्यांचा वापर करण्यात येणार नाही, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले. सरकार याची उलूबेरीया उत्तर मतदारसंघातील हावडा सेक्टर १७ येथे नियुक्ती करण्यात आली होती.

आयोगाने एका पत्रकाद्वारे सांगितले की, विभागीय अधिकाऱ्यांसाठीच्या सूचनांचे सरकार यांनी उल्लंघन केले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मोठ्या कारवाईसाठी आरोप निश्चित करण्यात येतील. त्यांच्याशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सर्वसाधारण निरीक्षक नीरज पवन यांनी इव्हीएम मशिनची सर्व सील तपासली. हे यंत्र त्यांच्या ताब्यात असून ते वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे.

एनकाऊंटर टिप्पणीवरून भाजप नेत्याला नोटीस
पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी देशाचा विश्वासघात केला आहे. दोन मे रोजी भाजप बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचे नक्कीच एनकाऊंटर केले जाईल, असे वक्तव्य बीरभूम विभागाचे भाजप अध्यक्ष ध्रुव साहा यांनी केले. याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली असून २४ तासांत खुलासा करण्यास सांगितले आहे. रविवारी नानूर परिसरातील प्रचार मोहिमेत साहा यांनी भाषण केले. त्याची चित्रफीत व्हायरल झाली. नानूर येथे भाजपने तारक साहा यांना उमेदवारी दिली आहे. तेथे २९ एप्रिल रोजी अखेरच्या आठव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

गेल्याच महिन्यात तृणमूलचे फलक घेतलेल्या समर्थकांच्या गराड्यात तेथे एका स्थानिक नेत्याच्या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाली होती. त्यात, या नेत्याने, भारतामधील ३० टक्के मुसलमान एकत्र आल्यास चार पाकिस्तान निर्माण होतील, असे वक्तव्य केल्याचे ऐकू येते. याप्रकरणी तृणमूल काँग्रेसने हात झटकले आहेत. या चित्रफितीमधील शेख आलम नामक नेता आपल्या पक्षाचा सदस्य नसून त्याच्या वक्तव्याला पक्षाचे समर्थन नाही असा खुलासा करण्यात आला आहे.

उमेदवाराचा पाठलाग करून मारहाणीचा तृणमूलचा आरोप
आरामबाग मतदारसंघातील उमेदवार सुजाता मोंडल खान यांचा पाठलाग करून त्यांना मतदान केंद्रातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले तसेच त्यांच्या डोक्यावर मारण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला असून याबद्दल भाजपला दोषी धरले आहे. भाजपने याचा इन्कार केला आहे. अरांडी परिसरातील एका मैदानाच्या मध्यभागी सुजाता यांना लाठीधारी गटाने घेरले. यात सुरक्षा रक्षकही जखमी झाला.

मतदानादरम्यान भाजप कार्यकर्ते गोंधळ घालत असून तृणमूल समर्थकांना धमकावत असल्याचा आरोप सुजाता यांनी केला, जो भाजपने फेटाळून लावला. सुजाता अनुसूचित जातीच्या उमेदवार आहेत. त्या म्हणाल्या की, हिंसाचार करून आरामबागची जागा जिंकू असे भाजपला वाटत असेल, पण ते चुकत आहेत. मी मरणालाही न घाबरणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे.

गावकऱ्यांचा आरोप
अरांडी येथील गावकऱ्यांनी मात्र सुजाता यांनी आपल्या घरात घुसून गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. सुजाता यांचा गावकऱ्यांशी वाद होत असल्याची छायाचित्र व्हायरल झाली आहेत.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com