
शर्मा ही दिब्रुगडमधील ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारविरोधात पोस्ट लिहल्यामुळे शर्मा चर्चेत आली होती.
पगार घेणाऱ्या सैनिकांना शहीद म्हणता येणार नाही; FB पोस्टनंतर लेखिकेवर देशद्रोहाचा गुन्हा
गुवाहाटी : छत्तीसगडच्या विजापूर येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांबद्दल लेखिकेने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने देशभरात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. आसाममधील ४८ वर्षीय लेखिकेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. शनिवारी (ता.३) विजापूर येथील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २२ कोब्रा कमांडो शहीद झाले. त्यांच्याबद्दल लेखिका शिखा शर्माने आक्षेपार्ह पोस्ट लिहल्याने याचे आसाममध्ये पडसाद उमटले आहेत.
शर्माविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लेखिका शिखा शर्मा गुवाहाटीमध्ये वास्तव्यास आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ (देशद्रोह) यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिखा शर्माला गुरुवारी (ता.८) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती गुवाहाटीचे पोलिस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी दिली.
- Corona: दुसऱ्या लाटेने मोडले सगळे रेकॉर्ड्स; एका दिवसांत आढळले तब्बल 1.15 लाख रुग्ण
शर्मा ही सोशल मीडियात अॅक्टिव्ह आहे. सोमवारी (ता.५) एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, 'कर्तव्य बजावताना आपला जीव गमावलेल्या पगारदार जवानांना शहीद म्हणता येणार नाही. या युक्तिवादाच्या आधारे जर वीज विभागात काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा विजेच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाला तर त्यालाही शहीद हा दर्जा द्यायला हवा. माध्यमांनी लोकांच्या भावनांशी खेळू नये.'
- भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज'; IMFनं वर्तवला अंदाज
शिखावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा
शिखा शर्माच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयातील वकील उमी डेका बरुआ आणि कंगना गोस्वामी यांनी दिसपूर येथील पोलिस ठाण्यात शर्माविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा आमच्या शहीदांचा घोर अपमान आहे. अशा प्रकारच्या टिप्पणीमुळे देशसेवेसारख्या पवित्र भावनेला ठेस पोहचेल. त्यामुळे लेखिकेविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी दोन्ही वकिलांनी केली आहे.
- SBIची मोठी घोषणा; घरबसल्या घ्या ८ सेवांचा फायदा
यापूर्वीही सरकारविरुद्ध भाष्य केल्याने चर्चेत
लेखिका शर्माविरोधात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याआधारे लेखिकेला अटक करण्यात आली आहे. शर्मा ही दिब्रुगडमधील ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारविरोधात पोस्ट लिहल्यामुळे शर्मा चर्चेत आली होती. त्यावेळी लेखिकेला बलात्काराच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिस अधिकारी प्रफुल्ल कुमार दास यांनी दिली.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Assam Writer Shikha Sarma Held Sedition Questioning Martyrs Fb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..