esakal | मृतदेहांबरोबर रॅली काढा, ममतादीदींची ऑडिओ क्लिप व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

ममता बॅनर्जी

मृतदेहांबरोबर रॅली काढा, ममतादीदींची ऑडिओ क्लिप व्हायरल

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या काही वेळ आधी शुक्रवारी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यात त्या टीएमसीच्या एका उमेदवाराबरोबर बोलत आहेत. ममता बॅनर्जींनी या ऑडिओत सीतलकूची येथील पक्षाच्या उमेदवाराला बोलताना काही सूचना केल्या आहेत. सीआयएसएफच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला होता. या चार जणांच्या मृतदेहासह निवडणुकीची रॅली काढा अशी सूचना ममता बॅनर्जी हे त्या उमेदवाराला देत असल्याचे ऐकू येते. दरम्यान, टीएमसीने मात्र ही क्लिप बनावट असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही जेव्हा-जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस असतो. त्यावेळी भाजपच्या आयटी सेलकडून एखादी ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जात असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, 'सकाळ'ने हा ऑ़डिओ तपासून पाहिलेला नाही. या ऑडिओत ममता बॅनर्जी या टीएमसीचे उमेदवार पार्थ प्रितम रे शी बोलत आहोत. त्या म्हणतात की, घाबरू नका, सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या 4 जणांच्या मृतदेहांबरोबर रॅलीची तयारी करा. दरम्यान, भाजपने ममता बॅनर्जींनी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा: याला म्हणतात "ठाकरे ब्रँड", मनसेचा शिवसेनेला टोला

भाजपने जारी केला व्हिडिओ

भाजप नेते आणि आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ही ऑडिओ क्लिप जारी करताना म्हटले की, ऐका ममता बॅनर्जी सीतलकूची येथे मृतदेहांबरोबर मोर्चा काढू इच्छित होत्या. त्या एसपी आणि आयसींना अडकवू इच्छित होत्या..एनपीआर आणि डिटेन्शन सेंटरची अफवा पसरवून अल्पसंख्यांकांची मते आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत होत्या. अशा मुख्यमंत्र्याकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते का ? त्या केवळ अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा: पुणेकरांनो, काळजी घ्या! उन्हाचा चटका वाढणार

ममता बॅनर्जींविरोधात एफआयआर

सीतलकूची येथील घटनेत केंद्रीय सुरक्षा दलांकडून झालेल्या गोळीबारात 4 जण ठार झाले होते. चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकूची येथे एका मतदान केंद्रावर सुरक्षा दलावर स्थानिकांनी हल्ला केला होता. याचदरम्यान, जमावाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हातातील रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात सीतलकूची येथील केंद्रीय सुरक्षा दलाविरोधात लोकांना भडकवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'सुशांतसारखं त्याला आत्महत्येस प्रवृत्त करू नका'; करण जोहरवर भडकली कंगना

loading image
go to top