esakal | पुणेकरांनो, काळजी घ्या! उन्हाचा चटका वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

Heat Wave

पुणेकरांनो, काळजी घ्या! उन्हाचा चटका वाढणार

sakal_logo
By
टिम इ सकाळ

पुणे : शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह गेले चार दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाचे सावट आता दूर झाला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. शहर आणि परिसरात गेल्या ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी सोमवारपासून हजेरी लावत होत्या. पावसासाठी पोषक असलेल्या वातावरणाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा कमाल तापमानाचा पारा वाढेल. पुण्यात शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअस नोंदला गेला. तो आता ३९ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने तापमान वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश कोरडे झाल्याने उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १८.६ अंश सेल्सिअस होते. राज्याच्या विविध भागात गारपीट, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा वेगाने घसरला.

हेही वाचा: कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

हेही वाचा: कोरोना संसर्गाशी संग नको! लक्षणे दिसल्यानंतर उशिरा चाचणी बेतू शकते जिवावर

विदर्भ व परिसरात चक्रीय वादळ

अरबी समुद्राचा आग्नेय भाग ते केरळ किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तर उत्तर पश्चिम बंगाल व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर विदर्भ व परिसरातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती असून, ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच ओडिशाच्या दक्षिण व उत्तर परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात वातावरणात पुढील काही दिवसांत चांगलेच बदल होण्याची शक्यता आहे.

loading image