
बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि भाजपचे उमेदवार राहुल सिंघा यांनी वादग्रस्त विधाने केली असून त्यांच्यावर आयोग कारवाई का करीत नाही, असा सवाल इतर पक्षांच्या नेत्यांनी केला.
सीआरपीएफने आठ जणांना मारायला हवे होते; भाजप प्रदेशाध्यक्षाचं खळबळजनक वक्तव्य
कोलकता - प्रचारावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी या कोलकत्यामधील गांधी पुतळ्याजवळ धरणे धरणार आहेत. डावे नेते सुजन चक्रवर्ती यांनी बॅनर्जी यांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि भाजपचे उमेदवार राहुल सिंघा यांनी वादग्रस्त विधाने केली असून त्यांच्यावर आयोग कारवाई का करीत नाही, असा सवाल इतर पक्षांच्या नेत्यांनी केला.
उत्तर बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील हिंसाचारासारख्या घटना अजून घडायला हव्यात, असे वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केल्यानंतर आता या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिंघा यांनी सीतालकुचीमध्ये ‘सीआरपीएफ’ने केवळ चार जणांनाच मारले, त्यांनी आठ जणांना ठार करायला हवे होते, असे खळबळजनक वक्तव्य केले.
हे वाचा - ममतादीदींना निवडणूक आयोगाचा दणका; प्रचारावर घातली बंदी
सिंगा हे उत्तर २४ परगणातील हबरा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पत्रकारांशी सोमवारी बोलताना त्यांनी हे विधान केले. घोष यांनी मात्र काल केलेल्या विधानावर घूमजाव करीत सीतालकुचीमधील घटना अत्यंत दुर्दैवी होती, असे सांगितले.
दरम्यान, कोलकता सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मोदी त्यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ‘दीदी ओ दीदी’ असा उल्लेख करीत टोमणा मारतात. यामुळे छेडछाडीला उत्तेजन मिळते, असे तक्रारीत म्हटले आहे. या संस्थेने पोलिस स्थानकासमोर निदर्शनेही केली. शिवाय मोदी यांच्या या शेऱ्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली.
Web Title: West Bengal Assembly Election 2021 Bjp Dilip Ghosh Tmc Mamata Banarjee
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..